एक्स्प्लोर

आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार

या  घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  एकाच दिवशी संपूर्ण कुटुंब संपल्याने गावात खळबळ उडाली आहे.

Buldhana crime: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात मुलाने स्वतःच्या आई-वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून अखेर स्वतःचाही जीव संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय . या  घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  एकाच दिवशी संपूर्ण कुटुंब संपल्याने गावात खळबळ उडाली आहे.

 Crime News: काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव डुकरे येथील विशाल सुभाष डुकरे (वय 42) या व्यक्तीने गुरुवारी सकाळच्या सुमारास आपल्या आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले. यात वडील सुभाष डुकरे (वय ७५) आणि आई लता डुकरे (वय 65) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आई-वडिलांची हत्या केल्यानंतर विशाल डुकरेंने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही भीषण घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे, चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. घराला संपूर्णपणे सील करण्यात आले असून पंचनामा सुरू आहे. तिन्ही मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी जिल्हा उपरुग्णालय, चिखली येथे हलविण्यात आले आहे.  या हत्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  पोलिसांकडून शेजाऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.

या घटनेनंतर सावरगाव डुकरे गावात शोककळा पसरली आहे. एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आई-वडिलांची हत्या करून पुराने स्वतःचाही जीव संपवल्याचा प्रकार समोर आल्याने गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, फॉरेन्सिक तपासणी आणि मृतदेहांच्या पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच हत्येमागचं खरं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी रायगडमधेही असाच प्रकार घडला होता. 

पोराने वृध्द आईबापाला संपवलं 

म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. वृद्ध दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यूमागील रहस्य अखेर उलगडलं असून, हे प्रकरण थेट कौटुंबिक वैरातून उभं राहिल्याचं समोर आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या वृद्ध दांपत्याची हत्या कुणी परका नाही, तर त्यांच्या स्वतःच्या दोन मुलांनीच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. (Crime news) आईवडील आपल्याला घरखर्च देत नाहीत, घरात राहू देत नाहीत याच्या रागातून दोन्ही मुलांनी आपल्याच आईवडिलांचा काटा काढल्याचा प्रकार समोर आलाय.मृतांची नावे महादेव कांबळे (वय 70) आणि विठाबाई कांबळे (वय 65) अशी असून, दोघांचे मृतदेह दोन दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले होते

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget