एक्स्प्लोर
Photo : भर पावसात छत्री घेऊन कृषीमंत्री अब्दुल सत्तार नुकसानीच्या पाहणीसाठी बांधावर
Unseasonal Rain: गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यातील (Marathwada) वेगवेगळ्या भागात सतत अवकाळी पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे.

Photo : भर पावसात छत्री घेऊन कृषिमंत्री अब्नुदुल सत्तार नुकसानीच्या पाहणीसाठी बांधावर
1/10

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज (29 एप्रिल) सिल्लोड (Sillod) तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
2/10

वरून मुसळधार पाऊस सूरु असताना हातात छत्री घेऊन कृषीमंत्री यांनी नुकसानग्रस्त भागातील पाहणी केली.
3/10

नुकसानग्रस्तांशी संवाद साधत चिंता करू नका सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दांत मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
4/10

कृषीमंत्री सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातील मंगरूळ, हट्टी, सासुरवाडा, खुल्लोड, निल्लोड, बाभूळगाव, गेवराई सेमी आदी भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
5/10

झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल पाठविण्याचे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
6/10

बऱ्याच ठिकाणी विजेचे खंबे पडल्यामुळे काही गावांत वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
7/10

दोन दिवसांपासून पाऊस पडतो आहे, त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने देखील दक्ष राहून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.
8/10

तर अवकाळी पावसामुळे पीक अक्षरशः आडवी झाली आहे. दरम्यान सत्तार यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तर नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिली.
9/10

तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उभं केलेले लोखंडी शेड वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर पडले आहे. तर सत्तार यांनी अशा शेडची देखील पाहणी केली.
10/10

सोबतच सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने काही घरांची पडझड झाली असून, कृषीमंत्री यांनी पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
Published at : 29 Apr 2023 06:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
