एक्स्प्लोर

Crime News: बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?

Crime News: उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. पती बेडरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह बेडवरती आढळले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime News: उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू (five family members Dead) झाला आहे. पतीचा मृतदेह बेडरूममध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह खाटेवर (five family members Dead) पडलेले आढळले. माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक, फॉरेन्सिक टीम आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खोलीची कसून तपासणी केली आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.(five family members Dead) 

कैलाशपूर बनकट ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या लियाकत पूर्वा गावात आज शुक्रवारी सकाळी पती, पत्नी आणि तीन मुलांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. लियाकत पूर्वा येथील रहिवासी शमसुल हक यांचा मुलगा रोज अली (३२) याचा मृतदेह बंद खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यांची पत्नी शहनाज (३०), मुली तबस्सुम (६), गुलनाज (४) आणि मुलगा मुईन अली (१.५ वर्ष) यांचे मृतदेह घरात एका बेडवरती पडलेले आढळले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.(five family members Dead) 

Crime News: तो दीड वर्षानंतर कुटुंबासह मुंबईहून घरी परतलेला

श्रावस्ती लियाकत पूर्वा येथील रहिवासी रोज अली गेल्या दीड वर्षांपासून मुंबईत मजूर म्हणून काम करत होता. कार्तिक पौर्णिमेच्या मेळ्यासाठी तो घरी परतला.  त्याला आणखी सहा भाऊ आहेत, त्यापैकी एक भाऊ त्याच्या कुटुंबासह मुंबईत मजूर म्हणून काम करतो. उर्वरित पाच भाऊ अजूनही लहान आहेत आणि त्यांच्या आईसोबत घरी राहतात. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी पती-पत्नीत वाद झाला. पण वाद इतकही मोठा झालेला न्हवता. शुक्रवारी सकाळी बराच वेळ दार उघडले नाही तेव्हा आई जैतुना यांनी दार ठोठावले. तरीही कोणतीही हालचाल झाली नाही. तिने गावकऱ्यांना बोलावले. गावकऱ्यांनी दरवाजा तोडला तेव्हा रोज अली छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर त्याची पत्नी आणि मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले आढळले. असा अंदाज लावला जात आहे की, रोझ अली याने काही कारणास्तव त्याच्या पत्नी आणि मुलांना विष देऊन नंतर स्वतःला गळफास लावला. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

मृत व्यक्तीची खोली आतून बंद होती, त्यामुळे घटनेची परिस्थिती अधिकच संशयास्पद बनली आहे. कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा त्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे मृतदेह बेडवर पडलेले आढळले.

Crime News:  फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले 

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राहुल भाटी आणि एएसपी मुकेश चंद्र उत्तम यांनीही घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ashwini Naitam NCP : गडचिरोलीकर मलाच निवडून देतील,अजित पवार गटाच्या अश्विनी नैताम यांचा विश्वास
Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Embed widget