एक्स्प्लोर
Photo : मंत्री भुमरेंच्या विरोधात बातमी केल्याने 'सामना'ची शिंदे गटाकडून होळी, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar News: रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्याविरोधात बातमी छापल्याने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्राची छत्रपती संभाजीनगरमध्ये होळी करण्यात आली आहे.

Photo : मंत्री भुमरेंच्या विरोधात बातमी केल्याने 'सामना'ची शिंदे गटाकडून होळी, पाहा फोटो
1/8

मंत्री संदिपान भुमरे यांच्या समर्थकांनी पैठणमध्ये 'सामना' वृत्तपत्राची (Saamana News Paper) होळी केली आहे.
2/8

भुमरे यांच्या मतदारसंघात गुढीपाडवा झाल्यावर आनंदाचा शिधा पोहचला असल्याची बातमी आज सामनामध्ये छापून आली होती. दरम्यान याचाच राग आल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैठणमध्ये 'सामना' वृत्तपत्राची होळी केली आहे.
3/8

सरकारने घोषणा केलेला 'आनंदाचा शिधा' पैठण तालुक्यात गुढीपाडवा झाल्यावर पोहचला आहे. तर याबाबत सामनामध्ये आज बातमी छापण्यात आली होती.
4/8

'गद्दार भुमरेंच्या मतदारसंघात पाडव्यानंतर आला 'आनंदाचा शिधा' या मथळ्याखाली आज सामनामध्ये बातमी छापण्यात आली आहे.
5/8

याचाच राग आल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज पैठणच्या शिवाजी चौकात 'सामना' वृत्तपत्राच्या अंकाला जोडे मारत, पेपरची होळी केली.
6/8

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैठणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसरात सामनाची होळी केली.
7/8

यावेळी पायातील बूट काढून जोडोमारो देखील करण्यात आले. तसेच 'सामना पेपरचं करायचं काय, खाली मुंडके वरती पाय' अशा घोषणाबाजी देखील यावेळी केली.
8/8

तसेच यावेळी 'सामना पेपरचं करायचं काय, खाली मुंडके वरती पाय' अशा घोषणाबाजी देखील यावेळी केली.
Published at : 25 Mar 2023 04:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
