Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी आणि कामगार नेते बाबा आढाव यांचे आज रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी निधन झाले, ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजार होते, त्यांतच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच, शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. तर, गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले होते. तेव्हाही शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पन्नालाल सुराणा यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना आदरांजली वाहिली होती.
कोण आहेत बाबा आढाव?
1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. ते 94 वर्षांचे आहेत.
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी परखडपणे भाष्य केलं होतं. माणूस सकाळी कुठं असेल अन संध्याकाळी कुठं असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना सत्तेची भूक आहे. पण लक्षात ठेवायला हवं, 140 कोटी जनताच ठरवेल, कोणाचं काय करायचं असं बाबा आढाव म्हणाले. ते म्हणाले की, काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा. सध्याचं राजकारण खूप विलक्षण आहे. कॅनडा मधून माझे कुटुंबीय म्हणतायेत की भारतात काय चाललंय नेमकं? आपल्या इथं फक्त सत्तेसाठी सगळं सुरू आहे, असे म्हणत राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाबा आढाव यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या























