Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
Priyanka Gandhi: चर्चेचा उद्देश फक्त जनतेचे लक्ष त्यांच्या ज्वलंत समस्यांवरून विचलित करण्यावर असल्याचा हल्लाबोल खासदार प्रियांका गांधी यांनी केला. प्रियांका गांधी यांनी मोदींच्या भाषणाचा समाचार घेतला.

वंदे मातरमवरील चर्चा करण्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालची निवडणूक येत आहे. ज्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आणि देशासाठी कुर्बान्या दिल्या, त्यांच्यावर नवीन आरोप लादण्याची संधी सरकारला हवी आहे. या चर्चेचा उद्देश फक्त जनतेचे लक्ष त्यांच्या ज्वलंत समस्यांवरून विचलित करण्यावर असल्याचा हल्लाबोल खासदार प्रियांका गांधी यांनी केला. प्रियांका गांधी यांनी मोदींच्या भाषणाचा समाचार घेतला.
ज्वलंत मुद्द्यांवर सदनमध्ये चर्चा का होत नाही?
प्रियांका म्हणाल्या की, सरकार वर्तमान आणि भविष्याकडे पाहू इच्छित नाही, म्हणून ते पुन्हा त्याच भूतकाळात रेंगाळत राहू इच्छितात देशातील लोक आनंदी नाहीत, ते अनेक समस्यांनी त्रस्त आहेत आणि सरकार त्या समस्यांवर तोडगा काढत नाही. बेरोजगारी, महागाई, पेपर लीक होणे, आरक्षणासोबत खेळखंडोबा आणि महिलांच्या समस्यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर सदनमध्ये चर्चा का होत नाही? पंतप्रधान भाषण चांगले देतात, पण तथ्यांच्या बाबतीत ते कमजोर पडतात, असा हल्लाबोल त्यांनी केला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केले की, 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत पहिल्यांदा गायले. मात्र, हे कोणत्या अधिवेशनात गायले हे त्यांनी सांगितले नाही. ते काँग्रेसचे अधिवेशन होते.
तर आज देश विकसित झाला नसता
प्रियांका म्हणाल्या की, पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना सतत लक्ष्य केले जाते, ते या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 12 वर्षे तुरुंगात राहिले. नेहरूंनी जर इस्रो, डीआरडीओ, आयआयटी, आयआयएम (IIM), एम्स (AIIMS), बीएचईएल (BHEL), सेल (SAIL) सारख्या संस्थांची निर्मिती केली नसती, तर आज देश विकसित झाला नसता. नेहरूंच्या चुका आणि त्यांनी केलेले कथित अपमान याबद्दल पंतप्रधानांना जितक्या तक्रारी आहेत, त्या सर्वांची त्यांनी एक यादी करावी. त्यानंतर वेळ निश्चित करून यावर एकदा चर्चा करावी आणि एकदाचे हे प्रकरण बंद करावे. त्यानंतर सदनचा महत्त्वाचा वेळ जनतेच्या खऱ्या समस्या (बेरोजगारी, महागाई, महिलांचे प्रश्न) सोडवण्यासाठी वापरावा.
तेव्हा खबरी देण्याचे काम करत होते
अखिलेश यादव म्हणाले की, जे महापुरुष त्यांचे नाहीत, किंवा ज्या गोष्टी त्यांच्या नाहीत, त्या ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. वंदे मातरमने स्वातंत्र्याच्या आंदोलनात सर्वांना जोडले, परंतु आजचे दरारवादी लोक त्याच गोष्टीने देशाला तोडू इच्छितात. अशा लोकांनी पूर्वीही देशाशी दगाबाजी केली आणि आजही करत आहेत. ते म्हणाले की, वंदे मातरम हा दिखावा किंवा राजकारणाचा विषय नाही. जेव्हा सत्ता पक्षाच्या नेत्यांची भाषणे ऐकतो, तेव्हा असे वाटते की वंदे मातरम त्यांनीच तयार केलेले गाणे आहे. ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भागच घेतला नाही, ते वंदे मातरमचे महत्त्व काय जाणणार. काही लोक वंदे मातरम मनापासून बोलत होते, तर काही लोक त्याच स्वातंत्र्यप्रेमींविरुद्ध इंग्रजांसाठी जासूसी आणि मुखबरीचे (खबरी देण्याचे) काम करत होते.
ते म्हणाले की, हे लोक राष्ट्रवादी नसून राष्ट्रात फूट पाडणारे आहेत. ज्याप्रमाणे इंग्रज फोडा आणि राज्य करा करत होते. तसेच आज काही लोक फूट पाडण्याचा मार्ग अवलंबत आहेत. या लोकांचा इतिहास तपासला पाहिजे की त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर वंदे मातरम का गायले नाही. खबरी देणाऱ्यांना प्रश्न विचारला पाहिजे की, स्वातंत्र्यानंतरही त्यांनी स्वतःचे गीत का तयार केले? त्यांच्या एकांगी विचारांमुळे त्यांनी तिरंगा का फडकवला नाही?
इतर महत्वाच्या बातम्या























