एक्स्प्लोर
Agriculture: औरंगाबाद जिल्ह्यात पिकं करपू लागली, जमिनीला पडल्या भेगा, पाहा फोटो
औरंगाबाद : पावसाने पाठ फिरवल्याने औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

crop is damaged in Aurangabad
1/9

ऑगस्ट महिना अक्षरशः कोरडा गेल्याने आता पिकं माना टाकू लागले आहेत. जमिनीला भेगा पडल्या असून, पिकं करपू लागली आहेत.
2/9

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत फक्त 47 टक्के पाऊस पडला आहे. मागील वर्षी तीन महिन्यांत 110 टक्के पाऊस झाला होता.
3/9

तर, 581 मिमीच्या तुलनेत 273 मिमी पावसाचे प्रमाण आहे. त्यामुळे शासन आपल्या दारावर ही योजना राबवण्यापेक्षा शासनाला शेतकऱ्याच्या बांधावर पाठवून पंचनामे करण्याची म्हणी होऊ लागली आहे.
4/9

गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने औरंगाबाद जिल्ह्यात खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू शेतातील पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
5/9

औरंगाबाद तालुक्यातील निपाणी परिसरात तर बाजरीचे पिकं अक्षरशः करपू लागली आहे. तर जमिनीला भेगा पडत आहेत.
6/9

सध्या कडक उन्हाळा जानवत आहे. मागील काळात झालेल्या रिमझिम पावसामुळे कापूस, बाजरी, मका, तूर आदी पिके कशीबशी तग धरूण आहेत. पण समाधानकारक पाऊस नसल्याने त्यांची वाढ खुंटली आहे.
7/9

यंदाच्या पावसाळ्यात अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने नदी, नाले तहानलेले आहेत. विहीरी, बोअरवेलने तळ गाठला आहे.
8/9

भविष्यात चारा व पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. पावसाअभावी हिरवा चारा उत्पादीत करता येत नसल्याने दुधाचे उत्पादन घटल्याची शक्यता आहे.
9/9

विशेष म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
Published at : 29 Aug 2023 02:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
भारत
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion