एक्स्प्लोर
Aurangabad : सडलेला थर्माकोल अन् त्यावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
औरंगाबाद : भारताचे चांद्रयान चंद्रावर जाऊन पोहचले. भारताने केलेल्या प्रगतीची यामुळे जग नोंद घेत आहे. मात्र, त्याच भारताच्या एका गावात आज शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय.
aurangabad news
1/10

अवघ्या 7 वर्षांचे लेकरू जीव मुठीत धरून सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावरून शाळा गाठत असल्याचे चित्र औरंगाबादच्या भिवधानोरा गावात पाहायला मिळत आहे.
2/10

गंगापूर तालुक्यातील हे गाव असून. या मुलांना जायकवाडी धरणाच्या एक किमी बॅकवॉटरमधून सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावर बसून प्रवास करावा लागतो.
3/10

विशेष म्हणजे हा मतदारसंघ केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांचे आहे.
4/10

अथंग पाण्याचा साठा, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी आणि याच पाण्यात विषारी सापांचा धोका.
5/10

विषारी साप थर्माकोलच्या तराफ्यावर येऊन बसू नयेत म्हणून मुलांच्या हातात काठीचा सहारा आणि मनात जीवघेण्या प्रवासाची भीती.
6/10

हे चित्र कोणत्याची आदिवासी पाड्यावरील नसून, आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहे.
7/10

धरणाच्या बॅकवॉटरमधून सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावर बसून एक किलोमीटरचा प्रवास केल्यावर हा संघर्ष थांबत नाही. कारण नदीपात्रातून बाहेर पडताच घनदाट गवत आणि एक फूट पाण्यातून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करावी लागते.
8/10

एवढंच नव्हे तर पाण्यात शेतकऱ्यांनी टाकलेल्या विद्युत मोटारीचा धोका देखील कायम असतो.
9/10

अंगावर शहारे आणणारा हा प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून भिवधानोरा गावातील विध्यार्थी करतायत.
10/10

विशेष म्हणजे पोटच्या लेकरांचा हा जीवघेणा प्रवास पाहता अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणं बंद केलं आहे.
Published at : 29 Aug 2023 09:49 PM (IST)
आणखी पाहा























