एक्स्प्लोर

Saif Ali Khan Discharged: जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला

Saif Ali Khan First Photo: जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Saif Ali Khan Discharged From Lilavati Hospital Bandra: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खान (Saif Ali Khan) वर 16 जानेवारीला त्याच्या वांद्रे येथील राहात्या घरात घुसून चोरट्यानं जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर सैफ अली खानला (Saif Ali Khan Injured) तात्काळ वांद्र्यातील (Bandra) लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सैफवर तात्काळ शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. अशातच आता सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, सैफवर त्याच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शहजाद (Mohammad Shahzad) याच्या मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मुसक्या आवळल्या असून सध्या तो पोलीस कोठडीत (Police Custody) आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला 20 जानेवारीला (सोमवारी) डिस्चार्ज दिला जाणार होता. पण, ऐनवेळी सैफचा रुग्णालयातील मुक्काम आणखी वाढला. अचानक डिस्चार्ज पुढे का ढकलण्यात आला? याचं कारण कळू शकलं नाही. मात्र, आज हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सैफवर चोरट्यानं केलेल्या चाकू हल्ल्यादरम्यान त्याच्या पाठीत धारदार शस्त्राचा तुकडा अडकला होता. तात्काळ शस्त्रक्रिया करुन तो तुकडा काढावा लागला. या हल्ल्यातून सैफ सुदैवानं बचावला, कारण त्याच्या पाठीच ज्या ठिकाणी शस्त्राचा तुकडा अडकला होता. तो त्याच्या मणक्यापासून फक्त 2 मीमी अंतरावर होता. सैफला पॅरालिसिसचा धोका होता. अशातच डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून सैफ अली खानवर योग्य ते उपचार केले. आता सैफ बरा होऊन घरी परतला आहे. तरीसुद्धा सैफला डॉक्टरांनी काही काळासाठी बेडरेस्टचा सल्ला दिला आहे. 

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. त्यानंतर सैफला त्याचा मोठा मुलगा इब्राहिम आणि तैमूर रिक्षातून वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर खान कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तब्बल तीन दिवस मुंबई पोलीस आरोपीचा शोध घेत होते. पण, आरोपी गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफिनं ठाण्यातील कासारवडवली इशून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

चाकूची जखम खोलवर, पॅरालिसिसचा धोका, पण... 

सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर लीलावती रुग्णालयातील सर्जन डॉ. नितीन डांगे यांनी एबीपी न्यूजला याबाबत एक्सक्ल्युझिव्ह माहिती दिली. डॉक्टर नितीन डांगे यांनी सांगितलं की, चाकूचा अडीच इंचाचा तुकडा सैफ अली खानच्या पाठीत खोलवर घुसला होता. तो शस्त्रक्रिया करुन तातडीनं काढावा लागला. चाकू खूपच खोलवर रुतल्यानं मज्जातंतूच्या जवळपास इजा झाली होती. पाठितील जे पाणी असतं, ते लीक होतं होतं. तिथं आम्ही ऑपरेशन केलं. यामुळे सैफ अली खानला पॅरालिसिसचा धोका होता. पण तातडीनं उपचार केल्यामुळे तो टळला, असं डॉक्टरांनी सांगितलं. 

सैफ अली खानवर 6 वार करून आरोपी फरार 

सध्या सैफचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहजादनं वांद्र्यात राहणाऱ्या सलमान खान, शाहरुख खानसह अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती. वांद्र्यातून एका रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालककडून या सेलिब्रेटिंच्या घरांची माहिती आरोपीनं मिळवली होती. त्यापैकी सैफचं घर चोरी करण्यासाठी आत घुसण्यास योग्य आणि अधिक सोयीचं वाटल्यानं आरोपीनं सैफ अली खान आणि करिना कपूर खानचं घर निवडलं. 

आरोपी सैफचा मुलगा जहांगीरला (जेह) ओलीस ठेवून पैशांची मागणी करणार होता. पण, हे करत असताना घरातले सगळेच जागे झाल्यानं आरोपी घाबरला आणि तिथून पळ काढण्यासाठी बिथरलेल्या आरोपीनं अंधाधुंद वार करण्यास सुरुवात केली. याचवेळी सैफ अली खानवर एकूण 6 वार आरोपीनं केले आणि तिथून फरार झाला. आरोपीला बांगलादेशात पुन्हा जाण्यासाठी बनावट पासपोर्ट हवा होता, त्यासाठीच पैशांची व्यवस्था आरोपी करत होता, अशीही माहिती आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे. 

नेमकं घडलेलं काय? 

सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजाद चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरात घुसला होता. त्यानं आधी रेकी केली होती. त्यामुळे सुरक्षा रक्षकांचा वेढा किंवा सीसीटीव्ही नसल्यामुळे त्यानं कुणाच्याही नकळत वांद्र्यात सैफ-करिना राहात असलेल्या सद्गुरू शरण इमारतीत प्रवेश मिळवला. त्यानंतर इमारतीच्या पायऱ्यांवरुन त्यानं दहा मजले चढले आणि पुढे एसी डकमधून तो अकराव्या मजल्यावरच्या सैफ अली खानच्या घरात घुसला. डकच्या पाईपमधून तो थेट सैफचा लहान मुलगा जहांगीर (जेह) च्या खोलीच्या बाथरुममध्ये घुसला. बाथरुममधून घरात घुसत असताना तो अचानक जेहच्या रुममध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्यासमोर आला. तिनं आरडाओरडा केला, त्यावेळी घाबरलेल्या आरोपीनं महिला कर्मचाऱ्यावर चाकूनं वार केले. आवाज ऐकून सैफ त्याच्या खोलीतून धावत जेहच्या खोलीत पोहोचला आणि त्यानं आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी बांगलादेशातील प्रोफेशनल कुस्तीपटू असल्यामुळे तो सैफच्या हाती लागला नाही. उलट त्यानं फिरून सैफवर चाकूनं वार केला, त्याच्या पाठीत चाकू खुपसला... दोघांमध्ये झटापट सुरू होती. त्यानंतर सैफच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा वार केला. त्यानंतर त्याच्या हाटावर मनगटावर सपासप वार केले. अखेर तो सैफच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी ठरला आणि आरोपीनं तिथून पळ काढला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 5PM 25 March 2025Ajit Pawar vs Narayan Kuche :भाजप आमदाराचा प्रश्न,दादांचा पारा चढला;विधानसभेत नारायण कुचेंना भरला दमVinod Kamra New Song : हम होंगे कंगाल.., कुणाल कामराकडून नवा व्हिडीओ पोस्ट, शिवसेनेच्या नेत्यांची सडकून टीकाAnil Parab Full Speech : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी..ठाकरे गालातल्या गालात हसले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Embed widget