एक्स्प्लोर

Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!

Nilesh Lanke : पालकमंत्रिपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. यावरून खासदार निलेश लंके यांनी महायुतीवर निशाणा साधलाय.

Nilesh Lanke : राज्य सरकारकडून शनिवारी (दि. 18) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Minister List) जाहीर करण्यात आली. यात नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडमधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) आणि रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. गोगावले आणि भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज होऊन साताराच्या दरेगावी गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यानंतर रविवारी (दि. 19) नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. यामुळे पालकमंत्रिपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी हल्लाबोल केलाय.  

खासदार निलेश लंके म्हणाले, हे सरकारच शापित आहे. महायुतीतीलच एका बड्या मंत्र्याने एका पत्रकारांसोबत खासगीत बोलताना हे वक्तव्य केल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेल्या लोकांना पाडायचं आणि पडलेल्या नेत्यांना निवडून आणायचं, हे या सरकारने केलं, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. तर ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेलं सरकार टिकत नसतं, असा टोला लंके यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडी एक संघ राहील

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का वेगळी लढणार या संदर्भात आज मुंबई येथे तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे. यावर खासदार निलेश संख्येने प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी एक संघ राहील तसेच एकत्र लढतील, असे त्यांनी म्हटले आहे. 

जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य असेल 

धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्यासाठी शरद पवार यांचा विरोध होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याबाबत बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे आमचे मोठे नेते आहे. त्यांनी जे वक्तव्य केले त्यात तथ्य असेल. 

जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्ट्राचार

जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय जनशक्ती मंत्री आर. सी. पाटील यांना निवेदन दिले आहे. तर माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी ही योजना फक्त कागदवर झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच ज्या ठिकाणी 60 टक्के काम झाल आहे. त्या ठिकाणी 90 टक्के कामांचं बिल घेतल असल्याचा आरोप लंके यांनी केला आहे. या संदर्भात माझ्याकडे व्हिडिओ असून क्षमता नसतानाही ठेकेदारांना ही कामे देण्यात आले, असे त्यांनी सांगितले आहे. 

आणखी वाचा 

Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Beed Bank Scam: बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Beed Bank Scam: बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Embed widget