Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Ski Resort Hotel Fire Accident : भीषण आगीने 11 मजली इमारतीला वेढले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
Ski Resort Hotel Fire Accident : उत्तर-पश्चिम तुर्कीतील बोलू राज्यातील एका स्की रिसॉर्टमधील हॉटेलला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला. 32 जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बोलूच्या कार्तलकाया रिसॉर्टमध्ये आग लागल्याने चेंगराचेंगरी झाली. घाबरल्यामुळे दोघांनी इमारतीवरून उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये स्थानिक वेळेनुसार पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. भीषण आगीने 11 मजली इमारतीला वेढले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
A devastating fire at a hotel in Turkey leaves at least 10 dead, with people jumping out of windows in panic
— NEXTA (@nexta_tv) January 21, 2025
The tragedy occurred at the popular Kartalkaya ski resort in Bolu, Turkey. The fire broke out in the hotel's restaurant.
Reports confirm 10 fatalities, two of whom died… pic.twitter.com/L3SiPKlQjZ
आग लागल्यानंतर चेंगराचेंगरी झाली
बोलूचे गव्हर्नर अब्दुलअजीज आयदिन यांनी सांगितले की, या हॉटेलमध्ये 234 पाहुणे थांबले होते. आगीमुळे चेंगराचेंगरी झाली. काही जणांनी घाईघाईने खिडकीतून पत्र्यामधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या 30 गाड्या आणि 28 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी 267 आपत्कालीन कर्मचारीही तैनात केले. रिपोर्टनुसार, तुर्कीचे पर्यटन आणि आरोग्य मंत्री अपघातस्थळी भेट दिली.
Tragedy strikes Turkey!
— Facts Prime (@factsprime35) January 21, 2025
Fire breaks out at Grand Kartal hotel in Kartalkaya ski resort, Bolu Province.
Multiple casualties reported.
Flames engulfed several floors, trapping guests.
Emergency services rushed to the scene. #Turkey #kartalkaya pic.twitter.com/GxwKHfYiAQ
तुर्कीमध्ये शालेय सुट्ट्या सुरू आहेत
कार्तलकाया हे इस्तंबूलच्या पूर्वेला सुमारे 300 किलोमीटर अंतरावर कोरोग्लू पर्वतांमध्ये स्थित एक लोकप्रिय स्की रिसॉर्ट आहे. सध्या तुर्कीमध्ये शाळांना सेमिस्टरच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे येथील सर्व हॉटेल्समध्ये मोठी गर्दी असते. खबरदारी म्हणून या भागातील इतर हॉटेल्स रिकामी करण्यात आली आहेत.
🚨#BREAKING: A fire broke out at the Grand Kartal Hotel in ski resort of Kartalkaya in Bolu, Turkey, killing 3 people and injuring 21 others.
— R A W S G L 🌎 B A L (@RawsGlobal) January 21, 2025=
The governor said there were 234 guests at the hotel, according to local media. The condition of the others weren't immediately clear. pic.twitter.com/hV7g2HrTYJ
इतर महत्वाच्या बातम्या