एक्स्प्लोर
Chandrapur News: चंद्रपूरात हजारो दिव्याची लखलखाट; श्रीरामाच्या नावे नवा विश्वविक्रम
Chandrapur News: चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानात 100 चौरस फूट जागेवर सियावर रामचंद्र की जय हा अक्षरी मंत्र 30 हजार दिव्याच्या पणत्या लावत प्रकाशमय करण्यात आले. त्यांची नोंद विश्वविक्रमात केली गेली
(फोटो क्रेडिट: facebook.com/Sudhir Mungantiwar)
1/10

अयोध्येमध्ये भव्य प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. या निमित्याने संपूर्ण देश 'राम'मय झाल्याचे चित्र आहे.
2/10

अशातच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्र संपूर्ण जगाला कळावे यासाठी हे अक्षरी मंत्र तब्बल 30 हजार दिव्यांनी सजविण्यात आले.
3/10

या आगळ्यावेगळ्या पद्धतीने भक्तीचा महोत्सवातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे नाव साता समुद्रापार पोहचविण्याचा विश्वविक्रम केला आहे.
4/10

चांदा क्लब मैदानावर 100 चौरस फूट जागेवर सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्र साकारण्यात आले.
5/10

त्यावर 30 हजार दिव्याच्या पणत्या लावत चांदा क्लब मैदान परिसर प्रकाशमय करण्यात आले.
6/10

आज 21 जानेवारीला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे पालकमंत्री मुनगंटीवार यांना नव्या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
7/10

22 जानेवारी पर्यंत चांदा क्लब मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
8/10

या सोहळ्यामुळे संपूर्ण चंद्रपूर शहरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
9/10

सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्राला 30 हजार दिव्यांनी प्रकाशमय करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये चंद्रपूरचे नाव नोंदविले गेले आहे.
10/10

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हा भव्य कार्यक्रम श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाने आयोजित केला होता.
Published at : 21 Jan 2024 12:29 PM (IST)
आणखी पाहा
























