एक्स्प्लोर
Photo: सेक्रेड गेम्समुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेने ऊस कामगारांच्या मुलांसाठी उभी केली शाळा
Rajshri Deshpande: बहुचर्चित असलेल्या सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेला आपण आतापर्यंत अनेक चित्रपटात पाहिले आहे.
Rajshri Deshpande
1/10

मात्र अभिनयाच्या पलीकडे राजश्री करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची देखील अनेकदा चर्चा होते.
2/10

तिच्या अशाच एका सामाजिक उपक्रमांने सर्वांचे मनं जिंकले आहे.
3/10

शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबादच्या ढोरकीन तांड्यावर राजश्रीच्या हस्ते एका जिल्हा परिषदेच्या शाळेचे लोकार्पण सोहळा पार पडला.
4/10

विशेष म्हणजे या शाळेची ईमारत राजश्रीने स्वखर्चाने उभी केली आहे.
5/10

अंदाजे 500 लोकसंख्या असलेल्या औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ढोरकीन तांड्यावरील जिल्हा परिषदेची शाळा मोडकळीस आली होती.
6/10

शाळेतील काही शिक्षकांनी याबाबत राजश्रीशी संपर्क करत, शाळेची अडचण सांगितली.
7/10

गावकऱ्यांना आपण दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचे राजश्रीने ठरवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने शाळेच्या कामाला सुरवात झाली.
8/10

सुसज्ज असे वर्ग,खेळण्यासाठी मैदान अशा या निसर्गरम्य वातावरणातील शाळेचे आज लोकार्पण सोहळा पार पडला.
9/10

मराठवाड्यातलं पांढरी आणि अमनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा राजश्रीने कायापालट केला होता.
10/10

त्या नंतर आता ढोरकीन येथील तांड्यावर शाळेसाठी नवीन ईमारत उभी केली आहे.
Published at : 05 Sep 2022 06:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
बातम्या
























