एक्स्प्लोर
Ahilyanagar Fire: अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू
Ahilyanagar Fire: अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे भीषण आगीची घटना घडली आहे. ज्यामध्ये फर्निचरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगेच्या घटनेत एकच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
Ahilyanagar Fire accident news
1/5

Ahilyanagar Fire: अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे भीषण आगीची घटना घडली आहे. ज्यामध्ये फर्निचरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगेच्या घटनेत एकच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. नेवासाफाटा येथील कालीका फर्निचरला हि भीषण आग लागल्याची घटना घडलीय.
2/5

मिळालेल्या माहितीनुसार अचानक लागलेल्या या भीषण आगीत एकाच कुटूंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मयूर अरूण रासने (वय 45 वर्ष), पायल मयूर रासने (वय 38 वर्ष), अंश मयूर रासने (वय 10 वर्ष), चैतन्य मयूर रासने (वय 7 वर्ष) या माय बापासह एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
3/5

हि आग इतकी भीषण होती कि या आगीत फर्निचरचे दुकान भस्मसात झाले आहे. तर दुकानाच्या पुढच्या बाजूला राहणारे कुटूंबीय धुराने गुदमरले आहेत.
4/5

अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेत आई वडीलांसह दोन मुलं आणि एक वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर एकावर सध्या उपचार सुरू आहेत.
5/5

हि घटना मध्यरात्रीनंतर घडली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांसह बचाव पथकाने आग आटोक्यात आणली. मात्र या भीषण आगीत फर्निचरचे दुकान भस्मसात झाले आहे.
Published at : 18 Aug 2025 10:39 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























