(Source: ECI | ABP NEWS)
Abu Azmi : वंदे मातरम् वरून पुन्हा वाद, अबू आझमींच्या विधानाने राजकारण तापलं Special Report
वाद जुनाच...पण समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमींच्या विधानामुळे त्याला नव्यानं तोंड फुटलंय...
वंदे मातरम... आपलं राष्ट्रीय गीत...
या गीताला दीडशे वर्षं झाल्याच्या निमित्तानं राज्य सरकारनं एक सर्क्युलर काढलाय...
सर्व शाळांमध्ये ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात या गीताचं सादरणीकरण करण्याचे निर्देश दिलेत...
यावर आक्षेप घेत अबू आझमींनी त्याचा संबंध भाजपच्या वोट बँकेच्या राजकारणाशी जोडलाय...
आझमी यांनी असा विरोध करताच भाजपनंही दंड थोपटले...
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भारतात राहायचं असेल, तर वंदे मातरम म्हणावं लागेल, असं ऐकवलंय...
तर नितेश राणेंनी आझमींना थेट पाकिस्तानात जायचा सल्ला दिलाय...
पुन्हा एक वंदे मातरमच्या निमित्तानं आझमींनी मुस्लीम कार्ड खेळलंय...
मात्र निवडणूक आयोगाविरोधात दंड थोपटणाऱ्या ठाकरे सेनेनं इतर मुद्दे बाजूला ठेवण्याचा सल्ला आझमींना दिलाय...
GFX IN
गीताच्या चौथ्या कडव्यात 'त्वम ही दुर्गां' म्हणजे तूच दुर्गा आहेस... असं मातृभूमीला उद्देशून म्हटलंय...
इस्लमाममध्ये मूर्तीपूजा आणि व्यक्तीपूजा करणं निषिद्ध आहे
त्यामुळे मातेच्या रुपातील भारताच्या पूजेला मान्यता दिली जात नाही
शिवाय आनंदमठ कादंबरीत मुस्लिमांची प्रतिमा चुकीचीरंगवल्याचाही आरोप होतो
परिणामी या कादंबरीतील गीत स्वीकारण्यास मुस्लिमांचा विरोध आहे
GFX OUT
ही झाली एक बाजू... पण अबू आझमी कायमच असे वाद निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत...
अलिकडेच त्यांनी रस्त्यावरील नमाज पढण्याची तुलना पंढरपूर वारीशी केली होती...
औरंगजेबाच्या कबरीचा वाद झाला असताना आझमींनी त्याला 'कुशल प्रशासक' म्हटलं होतं
भिवंडीमध्ये पत्रकारांनी मराठीत बाईट मागितल्यावर 'त्याची काय गरज' असं म्हणत वाद निर्माण केला...
असं असलं तरी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत... आझमी असोत... की भाजप... दोघांनाही आपापली व्होट बँक मजबूत करायचीये... त्यामुळे येत्या काही दिवसांत अशा मुद्दयांना आणखी हवा मिळाली गेली... तरी आश्चर्य वाटायला नको...
All Shows


































