एक्स्प्लोर
Radhakrishna Vikhe Patil: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट दर्ग्यात प्रार्थना
Radhakrishna Vikhe Patil: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुख्यमंत्री पदासाठी मुस्लिम बांधवांनी दर्ग्यात प्रार्थना केली.
Feature Photo
1/8

आत्तापर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे भावी मुख्यमंत्री फ्लेक्स राज्यभर झळकल्याच आपण पाहिलंय.
2/8

आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट दर्ग्यावरच प्रार्थना केल्याचं दिसून आलंय
3/8

संगमनेर शहरातील ख्वाजा पीर मोहम्मद दर्ग्यात विखेंच्या उपस्थितीत काल ही प्रार्थना करण्यात आली.
4/8

हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक असलेल्या ख्वाजा पीर मोहम्मद यांचा सध्या उरूस सुरू आहे
5/8

या उरुसाला भेट देण्यासाठी विखे पाटील संगमनेरात आले होते.
6/8

यावेळी दर्ग्यावर चादर अर्पण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी 2024 ला विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली
7/8

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातच भावी मुख्यमंत्री म्हणून विखेंसाठी केलेली प्रार्थना चर्चेचा विषय ठरतेय.
8/8

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून जोरदार चर्चा होती. नगरमध्ये तसे बॅनरही लागले होते.
Published at : 15 Sep 2023 10:24 AM (IST)
आणखी पाहा























