एक्स्प्लोर
New Bike Launch : 2022 TVS Apache RTR 200 4V लवकरच बाजारात दाखल होणार, पाहा फोटो
tvs-apache-200-right-side-view2
1/7

2022 Apache RTR 200 4V Price: नवी 2022 अपाचे आरटीआर 200 4V लवकरच बाजारात दाखल होणार असून याची एक्स शोरुम किंमतही कंपनीने जाहीर केली आहे.
2/7

टीव्हीएस मोटार (TVS Motor) कंपनीने मंगळवारी (1 डिसेंबर) नवी 2022 अपाचे आरटीआर 200 4 व्ही (2022 Apache RTR 200 4V) लॉन्च केली आहे. या बाईकची सुरुवाती किंमत 1 लाख 33 हजार 840 रुपये (EX Showroom Price) इतकी असणार आहे.
3/7

या नव्या 2022 Apache RTR 200 4V मध्ये दोन प्रकार असणार आहेत. ज्यामध्ये सिंगल-चॅनल ABS आणि डुअल-चॅनल ABS असे प्रकार असतील. यातील सिंगल चॅनेल ABS ची किंमत 1 लाख 33 हजार 840 रुपये आणि डुअल-चॅनल ABS ची किंमत 1 लाख 38 हजार 890 रुपये असणार आहे.
4/7

नव्या 2022 Apache RTR 200 4V मध्ये तीन रायडिंग मोड (स्पोर्ट, अर्बन आणि रेन) असतील. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने रायडिंग करु शकतो
5/7

याशिवाय बाईकमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे फ्रंट सस्पेंशन, टीव्हीएस स्मार्टएक्सोनेक्ट ब्लूटूथ कनेक्टिविटी, मोनो-शॉक आणि अॅडजस्टेबल ब्रेक असे फिचर्स असणार आहेत.
6/7

नव्या 2022 अपाचे आरटीआर 200 4व्ही मध्ये 197.75cc, सिंगल-सिलेंडर, फोर-वॉल्व, ऑयल-कूल्ड इंजिन असणार आहे. यावेळी 5-स्पीड गियरबॉक्स देण्यात आलेला आहे.
7/7

तर बाईकचं इंजिन 8,500rpm वर 20.5PS आणि अधिकतम पॉवर आणि 7,500rpm वर 16.8Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. स्पोर्ट्स मोडमध्ये बाईकचा टॉप स्पीड 127 Km/h आणि इतर मोडमध्ये 105 Km/h इतकं स्पीड असणार आहे. बाईक ग्लॉस ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मॅट ब्लू या रंगात उपलब्ध असेल.
Published at : 01 Dec 2021 05:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























