पृथ्वीप्रमाणेच मंगळावरही तीन अब्ज वर्षापूर्वी जीवसृष्टी असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असते. त्याचाच अभ्यास करण्यासाठी नासाने पर्सेव्हरन्स मार्स रोव्हर मंगळावर पाठवले आहे.
2/7
नासाने पाठवलेलं हे रोव्हर मंगळावरील मातीचे सॅम्पल तसेच इतर अवशेष घेऊन पृथ्वीवर येणार आहे. हे अभियान दोन वर्षे चालणार असंही सांगण्यात येतंय.
3/7
ही नव्या युगाची सुरुवात आहे अशी भावना नासाच्या सायन्स असोसिएट अॅडमिनिस्टेटर थॉमस झुर्बकेन यांनी सांगितलं आहे.
4/7
सात महिन्यांच्या काळात ताशी 19,000 किमी या वेगाने पर्सेव्हरन्स मार्स रोव्हरने 293 मिलियान मैलाचे अंतर कापले आहे.
5/7
नासाचं मंगळावर उतरलेलं हे पाचवं रोव्हर आहे. नासानं सांगितल्याप्रमाणे 'द सेव्हन मिनिट्स ऑफ टेरर' हा काळ रोव्हर मंगळावर उतरताना सर्वाधिक महत्वाचा आणि आव्हानात्मक काळ होता.
6/7
नासाच्या या रोव्हरने मंगळावर आपले पाऊल ठेवताच नासाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोश केला. नासासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
7/7
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सात महिन्यापूर्वी नासाने हे रोव्हर मंगळावर पाठवलं होतं. आता ते रोव्हर मंगळावर यशस्वी उतरलं आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाट तीन वाजण्याच्या सुमारास नासाचे हे रोव्हर मंगळावर उतरलं आहे.