तुम्हाला जर बन आवडत नाही आणि केस मोकळे सोडलेलेही आवडत नसतील तर ही टाइट पोनी टेल तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल. या हेअरस्टाईलची खासियत म्हणजे कोणत्याही कॅज्युअल, पारंपारिक किंवा फॉर्मल पोशाखावर ही हेअरस्टाईल सूट होते. (Photo Credit - Instagram)
2/9
जर बन तुमच्या फेव्हरेट लिस्टमध्ये नसेल तर ही हेअरस्टाईल तुम्ही नक्की करु शकता. वर मेसी लूक देऊन खाली मोकळे केस ठेवता येतात. जर तुम्ही पारंपारिक पोशाखाचा जास्त वापर करत असाल तर हा लूक तुमच्यासाठी बेस्ट राहिल. (Photo Credit - Instagram)
3/9
तुमचे केस जर पातळ असतील तर तुम्ही हा मेसी बन नक्की ट्राय करा. याने तुमच्या स्टाईलला चांगला लूक तर येईलच. (Photo Credit - Instagram)
4/9
जर तुम्ही काहीतरी भन्नाट, इतरांपेक्षा वेगळी हेअरस्टाईल करण्याच्या शोधात असाल तर आलियाचा हा लूक तुमच्यासाठी योग्य ठरेल. (Photo Credit - Instagram)
5/9
मधून भांग पाडून सोडलेले केस आणि त्यात हलके कलर्स ही कोणत्याही समारंभासाठी शानदार स्टाईल आहे. लग्नसमारंभापासून ते अगदी फॅमिली गेट टूगेदर पर्यंत तुम्ही या हेअरस्टाईल करु शकता. (Photo Credit - Instagram)
6/9
जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल तर तुम्ही आलियाच्या या लूकला फॉलो करु शकता. सेमी स्ट्रेट या हेअरस्टाईलने तुमचा लूक उठून दिसेल. तसेच हा लूक बनविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट करावे लागत नाहीत. (Photo Credit - Instagram)
7/9
ही मेसी फिशटेल ब्रेडपण तुमच्या रुपाला चार चाँद लावतील. कोणत्याही कॅज्युअल समारंभात हा लूक तुमच्यासाठी योग्य ठरेल. (Photo Credit - Instagram)
8/9
ही ब्रेडिड हेअरस्टाइल पण तुमच्यावर खुलून दिसेल. तुमच्या केसांनाही हटके लूक येईल. यात तुमचे केस थोडे सरळ तर थोडे बाऊंसी दिसतील. या हेअरस्टाइलची खासियत म्हणजे कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही घरच्या घरी ही हेअरस्टाईल स्वत:च करु शकता. (Photo Credit - Instagram)
9/9
सध्या लग्नसराईत ऑथेंटिक कपड्यांसोबत तुम्ही ही हेअरस्टाईल करु शकता. पारंपारिक पेहरावासोबत मधून भांग आणि टाइट बन. आज या स्टाइलचा टॉप ट्रेंडमध्ये समावेश झालेला आहे. (Photo Credit - Instagram)