एक्स्प्लोर
Skin Care: त्वचेची काळजी घेण्यासाठी टोमॅटोचा करा 7 प्रकारे वापर; चेहऱ्यावर दिसेल आश्चर्यकारक परिणाम
Skin Care Tips: टोमॅटो तुमच्या त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह, फॉस्फरस यांसारखे पोषक घटक त्यात आढळतात. जाणून घेऊया त्वचेवर टोमॅटो लावण्याचे फायदे...
Skin Care Tips
1/7

टोमॅटो कोरड्या त्वचेला मॉइश्चराइझ करण्याचे काम करते. यासाठी एक चमचा टोमॅटोच्या रसात एक चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा. काही वेळ हा पॅक चेहऱ्यावर लावून नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. टोमॅटोमुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होईल.
2/7

टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे तुमच्या चेहऱ्याचे अतिनील किरणांच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करते. दुसरीकडे, जर तुम्हाला सन टॅनिंगची समस्या असेल तर टोमॅटोच्या रसात काकडीचा रस मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे रॅशेसची समस्या देखील दूर होते.
3/7

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठीही टोमॅटोचा फायदा होऊ शकतो. यासाठी टोमॅटोचा रस करा आणि त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ टाका आणि चिमूटभर हळद घाला. जिथे ब्लॅकहेड असेल तिथे हे मिश्रण लावल्याने ब्लॅकहेडची समस्या दूर होईल.
4/7

टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडेंट घटक असतात, जे वृद्धत्वापासून बचाव होण्यास मदत करतात. यासाठी टोमॅटोच्या रसात दोन चमचे केळीचा पल्प मिसळा आणि एक चमचा मध मिसळून हे मिश्रण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा एक्सफोलिएट होईल आणि त्वचा तरुण दिसेल.
5/7

टोमॅटोमुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळते, जे त्वचेसाठी उपयुक्त आहे. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात जे जळजळ वर काम करतात.
6/7

धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर पुरळ येतात, अशावेळी तुम्ही टोमॅटो चेहऱ्यावर लावू शकता. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते, जे चेहऱ्याला खोलवर स्वच्छ करते. टोमॅटोमुळे मुरुमांची समस्या देखील दूर होते.
7/7

जर चेहऱ्यावर मुरुमांचे डाग राहिले असतील तर ते काढण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा फेस पॅक देखील लावू शकता. यासाठी एक चमचा टोमॅटोचा रस, दोन चमचे ओट्स, दूध, चिमूटभर हळद एकत्र करून चेहऱ्याला लावा. फेस पॅक सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवा, यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील.
Published at : 21 Jun 2023 05:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
बीड
क्राईम
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
