एक्स्प्लोर
पावसाळ्यात कपडे लवकर वाळवण्याचे सोपे उपाय!
पावसाळ्यात सतत दमट हवेमुळे कपडे लवकर वाळत नाहीत आणि त्यांना बुरशी, दुर्गंधी येते. काही सोपे उपाय करून हा त्रास टाळता येतो
पावसाळ्यात कपडे लवकर वाळवण्याचे सोपे उपाय!
1/9

स्पिन ड्रायरचा वापर करा, वॉशिंग मशीनमध्ये जास्त वेळ स्पिन केल्यास कपड्यांमधलं पाणी लवकर निघतं.
2/9

कपडे घरात हवेच्या प्रवाहात टांगा: खिडकी, पंख्याजवळ किंवा बाल्कनीत लावा, म्हणजे हवा फिरून कपडे वाळतील.
3/9

पंख्याखाली कपडे ठेवा : कपड्यांना थेट पंख्याची हवा दिल्यास वाळण्याची गती वाढते.
4/9

हेअर ड्रायर किंवा इस्त्रीचा वापर : छोटे कपडे (उदा. रुमाल, सॉक्स) हेअर ड्रायरने वाळवता येतात. किंचित ओले कपडे इस्त्रीनेही कोरडे होतात.
5/9

कपड्यांमध्ये अंतर ठेवा : एकमेकांना चिकटवून कपडे टांगू नका. हवा खेळली पाहिजे.
6/9

डीह्युमिडिफायर / रूम हीटर वापरा : खोलीतील आर्द्रता कमी केल्यास कपडे पटकन वाळतात.
7/9

विनेगर व बेकिंग सोडा वापरा : कपड्यांवर दुर्गंधी टाळण्यासाठी धुताना थोडं विनेगर किंवा बेकिंग सोडा वापरा.
8/9

अशा छोट्या टिप्समुळे पावसाळ्यातही तुमचे कपडे स्वच्छ, सुगंधी आणि लवकर कोरडे राहतील.
9/9

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 18 Aug 2025 02:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























