एक्स्प्लोर
Health tips: प्लास्टिकच्या डब्यातलं लोणचं ठरू शकतं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक!
Pickle in plastic Container Is Harmful: जर तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात लोणचं साठवून ठेवत असाल तर ते त्वरित बंद कर.तुमच्या आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते तुमची ही सवय.
Health tips
1/7

पूर्वी लोकं घरी लोणचं बनवलं की ते मातीच्या बरणीत साठवून ठेवायचे पण आजकाल सोयीनुसार लोणचं प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलं जातं.
2/7

इतकंच नाही तर बाजारातसुद्धा लोणचं प्लास्टिकच्या डब्यातच मिळतं.
3/7

लोणचं प्लास्टिकच्या डब्यात ठेवणं आपल्या आरोग्यसाठी खूप घातक ठरू शकतं.
4/7

लोणच्यामध्ये मीठ, तेल, आणि मसाल्यांचं प्रमाण खूप जास्त असतं, जेव्हा या सगळ्या गोष्टी प्लास्टिकच्या संपर्कात येतात तेव्हा त्यातून बी.पी.ए.सारखे नुकसानकारक केमिकल बाहेर पडायला लागतात.
5/7

लोणच्यामधील तेल आणि मीठ हे प्लॅस्टिकमधून निघणारे विषारी केमिकल्स अधिक वेगानं खेचून घेतात .यामुळे हार्मोनल असंतुलन, थायरॉईड आणि काही प्रकारच्या कॅन्सरचा धोकाही वाढतो.
6/7

जर तुम्हाला लोणच्याची टेस्टही कायम ठेवायची आहे आणि तब्येतही चांगली ठेवायची असेल तर ते चीनी मातीच्या बरणीत साठवून ठेवा. हे भांडं लोणच्याची टेस्ट आणि पोषण कायम ठेवतं.
7/7

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 27 Oct 2025 03:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























