Benefits Of Cinnamon : पाठदुखीच्या त्रासापासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही अशा वेळी दालचिनीचा वापर नक्की करू शकता.
2/8
अनेक उपचार करूनसुद्धा तुम्हाला जर पाठदुखीवर आराम मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला यावर रामबाण उपाय सांगणार आहोत.
3/8
हा उपाय म्हणजेच घरगुती मसाल्यात वापरली जाणारी दालचिनी. ही दालचिनी तुमच्या पाठदुखीच्या त्रासावर नक्कीच आराम मिळवून देऊ शकते. याचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या.
4/8
स्वयंपाकघरातील दालचिनी ही फक्त चवदारच नसते तर आजारांवरही ती फार उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त यांसारख्या अनेक घटकांसह सिनामल्डिहाइड आणि सिनामिक ऍसिडसारखे अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत.
5/8
दालचिनी शरीरातील खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यात मदत करतात. यामुळेच सांधेदुखी, आणि पाठदुखीमध्ये आराम मिळतो.
6/8
पाठदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी एक चमचा मधात दोन ग्रॅम दालचिनी पावडर टाकून खावे. दिवसातून दोनदा ही रेसिपी फॉलो करा. तुम्हाला पाठदुखीपासून लगेच आराम मिळेल.
7/8
एका पातेल्यात पाणी टाकून त्यात दालचिनीचे तुकडे किंवा थोडी पावडर टाकून थोडा वेळ उकळवा. नंतर एका कपमध्ये गाळून त्यात मध मिसळून गरमागरम प्या. हे पाणी तुम्ही दिवसातून किमान दोनदा म्हणजेच सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी घेणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला पाठदुखीपासून काही दिवसांत आराम मिळू लागेल.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.