एक्स्प्लोर
Eating Habits : सावधान! घाईघाईत अन्न खाल्ल्याने 'या' आजारांचा धोका वाढतो, होईल गंभीर नुकसान
Health Tips : अन्न हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. योग्य आणि नियमित पौष्टिक अन्न खाल्ल्याने आपलं विविध आजारांपासून संरक्षण होऊ शकते.

Eating Food Quickly Bad for Health
1/11

Health Tips : अन्न हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. योग्य आणि नियमित पौष्टिक अन्न खाल्ल्याने आपलं विविध आजारांपासून संरक्षण होऊ शकते.(PC : istockphoto)
2/11

सकस आहार घेतल्ल्याने अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. पण, आपल्याला अन्न खाण्याची योग्य पद्धतही माहित असणे आवश्यक आहे.(PC : istockphoto)
3/11

काही लोक जेवताना नेहमी घाई करतात आणि 5-10 मिनिटांत जेवण संपवतात. तुम्हीही तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील, जे घाईघाईत जेवतात.(PC : istockphoto)
4/11

जलद खाल्ल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का? घाईघाईत जेवल्यामुळे अन्नातील आवश्यक पोषक घटक देखील नष्ट होऊ शकतात? हेही तुम्हाला माहीत नसेल.(PC : istockphoto)
5/11

जे लोक घाईघाईने अन्न खातात ते अन्न चघळण्याकडे फारच कमी लक्ष देतात. फक्त पोट भरणे आणि भूक भागवणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. (PC : istockphoto)
6/11

जेव्हा तुम्ही चघळण्याच्या क्रियेकडे अधिक लक्ष द्याल तेव्हाच तुम्हाला अन्नाचा पुरेपूर फायदे मिळू शकेल.(PC : istockphoto)
7/11

अन्न योग्य प्रकारे चघळल्याने तुम्हाला जास्तीत जास्त पोषक तत्वे सहज मिळू शकतात. पचनक्रिया निरोगी राहते आणि अन्न लवकर पचते.(PC : istockphoto)
8/11

जे लोक घाईघाईत जेवतात त्यांना वजन वाढणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, मधुमेह आणि ऊर्जा कमी होणे, या समस्यांचा धोका वाढतो. (PC : istockphoto)
9/11

घाईघाईत जेवण्याचा आणखी एक तोटा असा की, तुम्हाला पोट भरलेल्याचं उशिराने कळते आणि तोपर्यंत तुम्ही खूप जास्त अन्न खाल्लेले असते.(PC : istockphoto)
10/11

हळूहळू आणि नीट चावून खाण्याची सवय लावा, यामुळे पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे शरीराला अन्नाचे पूर्ण पोषण मिळते.(PC : istockphoto)
11/11

योग्यप्रकारे हळूहळू आणि नीट चावून अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो आणि मधुमेहासह अनेक गंभीर आजार होण्याची शक्यताही कमी होते.(PC : istockphoto)
Published at : 21 Jul 2023 04:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
