एक्स्प्लोर
Winter : थंडीतही आईस्क्रीम खाणं शरीरासाठी उत्तम, 'हे' फायदे माहित आहेत?
Benefits of Ice Cream : आईस्क्रीम खाणं लहानथोर सगळ्यांनाच आवडतं, पण हिवाळा आला की आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, थंडीतही आईस्क्रीम खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. (PC : istockphoto)
Benefits of Eating Ice Cream in Winter
1/11

Benefits of Eating Ice Cream in Winter : आईस्क्रीम खाणं लहानथोर सगळ्यांनाच आवडतं, पण हिवाळा आला की आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, थंडीतही आईस्क्रीम खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. (PC : istockphoto.com)
2/11

तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा वाचलं असेल की, हिवाळ्यात गरम अन्नपदार्थांचं सेवन केले पाहिजे, यामुळे शरीर उबदार राहण्यास आणि उर्जा मिळण्यात मदत होते. उन्हाळ्यात आइस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडते, पण हिवाळ्यात आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला जातो. (PC : istockphoto.com)
3/11

अनेक वेळा आपल्या घरातील मोठी माणसंही सांगतात की, हिवाळ्यामध्ये म्हणजेच थंडीमध्ये आईस्क्रीम खाणं टाळावं. ताप-खोकला-सर्दी होण्याचा धोका असल्याने बहुकेत जण थंडीमध्ये आईस्क्रीम खाणं टाळतात. (PC : istockphoto.com)
4/11

हिवाळ्याच आइस्क्रीम खाल्ल्यामुळे तुमचं नुकसान होत नाही, तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. हे फायदे कोणते ते जाणून घ्या. (PC : istockphoto.com)
5/11

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आइस्क्रीम खाण्यास थंड असलं तरी त्याचा प्रभाव गरम असतो. आइस्क्रीममध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील उष्णता वाढवण्याचं काम करते. (PC : istockphoto.com)
6/11

घसादुखीपासून मिळेल आराम : घसा खवखवत असल्यास तुम्ही खाल्ल्यास तुम्हाला घसादुखीपासून आराम मिळेल. (PC : istockphoto.com)
7/11

तणाव कमी होतो : एका सर्वेक्षणात असे आढळून आलं आहे की, आईस्क्रीम खाल्ल्याने तणाव कमी होतो. जर तुम्ही दिवसभराच्या कामाने मानसिकदृष्ट्या थकले असाल तर तुम्ही आइस्क्रीम घाल्यावर तुमचा ताणतवाण नाहीसा होतो. (PC : istockphoto.com)
8/11

प्रथिने : आईस्क्रीम दुधापासून बनते आणि दुधात प्रथिने आढळतात. प्रथिने आपल्या शरीरातील स्नायू, त्वचा, हाडांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे हिवाळ्यातही आईस्क्रीम खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रथिने मिळून फायदा होतो. (PC : istockphoto.com)
9/11

जीवनसत्त्वे : आईस्क्रीममध्ये व्हिटॅमिन ए, बी2 आणि बी12 भरपूर प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन ए आपले डोळे, त्वचा, हाडे आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली राखते. आईस्क्रिममध्ये ही सर्व जीवनसत्त्वे म्हणजे व्हिटॅमिन्स असतात. (PC : istockphoto.com)
10/11

ओमेगा 3 : आइस्क्रीममध्ये व्हिटॅमिन डी आणि ओमेगा 3 ही भरपूर प्रमाणात असतात. ओमेगा 3 मेंदू, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे तर व्हिटॅमिन डी शरीराच्या हाडांसाठी महत्त्वपूर्ण आहे. (PC : istockphoto.com)
11/11

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 27 Nov 2022 12:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
विश्व


















