Nepal Protest : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन Gen Z क्रांती, चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताची बारीक नजर; आंदोलनाची A To Z माहिती
Nepal Protest : नेपाळमध्ये फेसबुक, यूट्यूब, एक्ससह 26 अॅप्सवर बंदीनंतर हजारो तरुण रस्त्यावर उतरले. सोशल मीडियावरील बंदी उठवावी यासाठी संघर्ष सुरू असून भारताची त्यावर बारीक नजर आहे.

मुंबई : नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीच्या (Nepal Social Media Ban) निमित्ताने युवक रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी थेट संसद पेटवली, न्यायालयाला आग लावली. गेल्या अनेक वर्षांपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात या युवकांनी हिंसक भूमिका (Nepal Protest) घेतली. नेपाळमधील आंदोलनात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला. केपी शर्मा ओली यांनी राजीनामा (KP Sharma Oli Resigns) दिल्यानंतर आता बालेन शाह (Balendra Shah) यांच्याकडे नव्या सरकारचे नेतृत्व जाणार आहे.
नेपाळच्या युवकांनी आंदोलन (Nepal Genz Protest) करत थेट मंत्र्यांच्या घरांवर हल्लाबोल केला. त्यामुळे मंत्र्यांनी देश सोडून जाण्याचा मार्ग पत्करला. आंदोलकांनी बालेन शाह यांना पंतप्रधान करा अशी भूमिका घेतल्यानंतर लष्कर प्रमुख आणि बालेन शाह यांच्यामध्ये चर्चा झाली. बालेन शाह आता नेपाळच्या अंतरिम सरकारचे प्रमुख असतील यावर शिक्कामोर्बत झालं आहे.
गेल्या काही वर्षांपासून नेपाळच्या राजकारणामध्ये चीनने मोठा हस्तक्षेप केला आहे. परिणामी त्या देशात आता आंदोलन सुरू झालं आहे. नेपाळ हा भारताचा जवळचा मित्र आहे. नेपाळच्या आंदोलनाचा परिणाम हा भारतावरही होऊ शकतो. त्याचमुळे भारतानेही नेपाळच्या सर्व परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली आहे.
Nepal New Law: सरकारचा नवा नियम कारणीभूत
नेपाळ सरकारने (Nepal Govt) एक नवीन बिल संसदेमध्ये आणलं होतं, ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना (Social Media Platforms Regulation) स्थानीय प्रतिनिधी नियुक्त करणे, नोंदणी (Registration Rule), आणि जबाबदारीचे नियम ठेवणे बधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, त्या देशातील युवकांना, तरुणांच्या गटांनी त्याला विरोध केला. सरकारचा हा नियम म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचं मत युवकाचं झालं आणि पुढे नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरू झालं.
Nepal Banned Apps List : बंदी आणण्यात आलेले अॅप्स कोणते?
नेपाळमध्ये 26 लोकप्रिय अॅप्स जसे Facebook, Messenger, Instagram, YouTube, WhatsApp, X (पूर्वी Twitter), LinkedIn, Snapchat, Reddit, Discord, Pinterest, Signal, Threads, WeChat, Quora, Tumblr, Clubhouse, Mastodon, Rumble, VK, Line, IMO, Zalo, Soul, Hamro Patro इत्यादींवर बंदी लागू करण्यात आली आहे
China Apps In Nepal : चीनच्या अॅपवर बंदी नाही
नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळे 26 अॅप्सवर बंदी घालण्यात आली असली तरी दुसरीकडे TikTok, Viber, Nimbuzz इत्यादी चीनी अॅप्सवर मात्र बंदी नाही. चीनच्या या कंपन्यांनी आधीच नोंदणी केली होती.
Nepal Political Crisis : नेपाळची सध्याची राजकीय स्थिती काय?
नेपाळमध्ये सध्या पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखाली CPN-UML आणि नेपाळी काँग्रेस सरकारने राजीनामा दिला. या सरकारवर चीनचा प्रभाव होता. त्यामुळेच देशातील तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आणण्यासाठी हा प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात आला.
ओपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काठमांडूचे महापौर बालेन शाह यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार सत्तेत येणार आहे.
Nepal Protest News : तरुणांच्या दोन प्रमुख मागण्या
या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या तरुणांच्या दोन मुख्य मागण्या आहेत:
- पोलिस व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवावा.
- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी सोशल मीडिया बंदी उठवावी.
- तरुणांच्या या मागण्यांना व्यापक पाठिंबा मिळत असून हे आंदोलन Gen-Z क्रांती म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
India Nepal Relations : भारताचे आंदोलनावर बारीक लक्ष
भारताच्या दृष्टीने हे आंदोलन विशेष लक्षवेधी आहे. कारण गेल्या वर्षी बांगलादेशात याच पद्धतीने तरुणांनी आंदोलन करुन पंतप्रधान शेख हसिना यांचे सरकार पाडले होते. आता भारताचा दुसरा शेजारी नेपाळही अशाच मार्गावर जात असल्याचे संकेत आहेत.
Nepal Politics : नेपाळमधील दोन मतप्रवाह
नेपाळची राजकारणातील दिशा सध्या दोन ठळक विचारप्रवाहांत विभागली गेली आहे:
चीन समर्थक गट – हा गट चीनकडून मिळणाऱ्या आर्थिक व राजनैतिक मदतीचे समर्थन करतो. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालेली आहे. तसेच नेपाळच्या अंतर्गत धोरणांमध्ये चीनचे सरकार हस्तक्षेप करत असून त्या द्वारे आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.
राजेशाही समर्थक गट – दुसरीकडे पुन्हा एकदा राजेशाहीला समर्थन वाढताना दिसत आहे. नेपाळचे माजी नरेश देशात परतले असून त्यांना विशेषतः तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यामुळे देश पुन्हा एकदा विचारसरणीच्या द्वंद्वात सापडला आहे.
China Impact On Nepal Politics : चीनचा प्रभाव आणि सोशल मीडिया बंदी
चीनमध्ये आधीपासूनच अमेरिका आणि युरोप प्रायोजित सोशल मीडियावर बंदी आहे. चीनने पाश्चात्य देशांची विचारसरणी रोखण्यासाठी स्वतःचे WeChat, Weibo, Douyin सारखे अॅप्स विकसित केले आहेत. नेपाळमध्येही त्याच धर्तीवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
Nepal Protest Reasons : नेपाळमध्ये आंदोलन का पेटलं?
- गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरोधात वातावरण निर्मिती झाली आहे.
- विरोधकांकडून सरकारच्या भ्रष्टाचारावर कडाडून टीका.
- नेपाळी जनतेमधून याला तीव्र विरोध (strong Nepali opposition).
- फेसबुक (Facebook), इन्स्टा (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp), यू-ट्यूब (YouTube), एक्स (X) अशा सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय.
- निर्णयाने संतप्त तरुणाई रस्त्यावर उतरली.
- 'GEN Z' वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी.
Who Is Balendra Shah : कोण आहेत बालेन शाह?
- नेपाळी रॅपर, संगीतकार, काठमांडूचे विद्यमान महापौर.
- नेपाळच्या राजकारणातील तरुण चेहरा.
- पहिले राजकारणी ज्यांनी 'जेन-झी' आंदोलनाला पाठिंबा दिला.
- एकीकडे नेत्यांची घर जळताना बालेन शाहांच्या नावाने आंदोलकांची घोषणाबाजी.
- लष्कराने ताबा घेतल्यावर बालेन शाहांकडे अंतरिम पंतप्रधान देण्यासाठी हालचाली.
- आंदोलन 'जेन-झी' (Gen Z protest) म्हणजेच तरुणांनी हाती घेतल्याने तरुण पंतप्रधानाची चर्चा.
- 2022 मध्ये अपक्ष लढलेले बालेन शाह काठमांडूचे महापौर झाले
- सोशल मीडिया (Social Media) आणि तरुणांच्या माध्यमातून बालेन शाहांनी (Balendra Shah) दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांना धक्का दिला.
Nepal Youth Protest : आंदोलनामागील शक्य ताकद
इतक्या मोठ्या संख्येने तरुणांनी संघटित पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणे हे सहजासहजी घडलेले नाही. यामागे एक नियोजनबद्ध ताकद, सशक्त नेतृत्व आणि संघटना असल्याचा संशय अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
नेपाळमध्ये सोशल मीडिया (Social Media) बंदीविरोधात उभ्या राहिलेल्या तरुणांच्या चळवळीने देशाच्या राजकीय भवितव्याला नवे वळण मिळू शकते. भ्रष्टाचारविरोधी मागणी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आणि चीन–भारत (China India) या शेजाऱ्यांच्या भू-राजकीय स्पर्धेत अडकलेले नेपाळ हे पुढील काळात संपूर्ण दक्षिण आशियासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा:

























