एक्स्प्लोर

Balendra Shah : नेपाळमध्ये आता Gen Z चा रॅपर पंतप्रधान, कर्नाटकात शिक्षण, ओलींना हटवलं, कोण आहेत बालेन शाह?

Balendra Shah Profile : नेपाळच्या आंदोलकांनी संसद पेटवली असून केपी ओली शर्मा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनाम दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये आता सत्तांतर होणार असून नवीन नेतृत्व उदयास येणार आहे.

मुंबई : नेपाळमध्ये (Nepal) सोशल मीडिया (Social Media) वरील बंदीचे निमित्त ठरले आणि Gen Z आंदोलन पेटलं. युवकांनी हिंसक भूमिका घेत संसद (Nepal Parliament Fire) पेटवली, न्यायालयाला आग लावली. त्याचप्रमाणे मंत्र्यांच्या घरांवर हल्लाबोल केला. त्यामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून ते दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाली असून आंदोलकांनी एका युवकाचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केलं आहे, ते नाव म्हणजे काठमांडूचे 35 वर्षीय महापौर (Kathmandu Mayor) बालेन शाह (Balendra Shah) होय. एक रॅपर (Nepal Rapper), महापौर ते आता नेपाळचे नवे नेतृत्व असा त्यांचा प्रवास काहीसा भन्नाट आहे.

Who Is Balendra Shah : कोण आहेत बालेन शाह?

बालेन शाह यांचा जन्म 27 एप्रिल 1990 रोजी काठमांडू येथे झाला. वडील आयुर्वेदिक चिकित्सक तर आई गृहिणी आहेत. त्यांनी BE सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. कर्नाटकातील विश्वेशरैय्या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून (Visvesvaraya Technological University VTU) त्यांनी स्ट्रक्चरर इंजिनिअरिंग या विषयात M.Tech पदवी घेतली.

Rapper Balendra Shah : रॅपर म्हणून सुरुवात 

बालेन शाह यांना सुरुवातीपासूनच संगिताची आवड होती. 2012 मध्ये ‘Sadak Balak’ या गाण्यामुळे बालेन शाह रॅपर म्हणून प्रसिद्ध झाले. 2013 मध्ये Raw Barz Rap Battle मधून ते आणखी लोकप्रिय झाले. रॅपच्या माध्यमातून त्यांनी नेपाळमधील भ्रष्टाचार, सामाजिक प्रश्न आणि राजकीय वास्तव यावर भाष्य केलं.

Balen Shah Political Journey : बालेन शाह यांचा राजकीय प्रवास

सन 2021 मध्ये त्यांनी काठमांडूच्या महापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. 26 मे 2022 रोजी काठमांडू महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांनी जोरदार विजय मिळवला. त्यांनी नेपाळी काँग्रेस आणि CPN (UML) यांसारख्या मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केले. 30 मे 2022 रोजी त्यांनी महापौरपदाची शपथ घेतली. काठमांडूचे पहिले स्वतंत्र महापौर म्हणून त्यांचा इतिहासात समावेश झाला. 2023 मध्ये TIME Magazine च्या ‘TIME 100 Next’ यादीत त्यांचा समावेश झाला.

Balen Shah Net Worth and Popularity : लोकप्रियता आणि संपत्ती

महापौर म्हणून त्यांचे मासिक वेतन सुमारे 46,000 आहे. अभियंता व्यवसाय, स्वतःची कंपनी Balen Consulting & Construction Pvt. Ltd., तसेच संगीत आणि स्टेज परफॉर्मन्समधून ते अतिरिक्त कमाई करतात. बालेन शाह यांची एकूण संपत्ती अंदाजे 5 ते 6 कोटी नेपाळी रुपये असल्याचे सांगितले जाते.

आजच्या Gen Z आंदोलनामध्ये युवक वर्गाचा मोठा पाठिंबा मिळाल्यामुळे अनेक जण त्यांना भविष्यातील राष्ट्रीय नेता म्हणून पाहत आहेत. त्यांच्या निर्भीड स्वभावामुळे ते आजच्या घडीला नेपाळच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव ठरले आहेत.

थोडक्यात, अभियंता, रॅपर आणि स्वतंत्र्य उमेदवार म्हणून महापौरपदावर निवडून आलेले बालेन शाह हे नेपाळच्या राजकारणात एक नवीन आणि पारदर्शक चेहरा म्हणून उदयास आले आहेत.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC Election 2026: शिवसेना 65, भाजप 57; कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
शिवसेना 65, भाजप 57; कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Ajit Pawar in Baramati: कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
IND Squad vs NZ ODI Series : टी-20 मधून हकालपट्टी, आता वनडे मालिकेतून स्टार खेळाडूला डच्चू?, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCI उचलणार कडक पाऊल
टी-20 मधून हकालपट्टी, आता वनडे मालिकेतून स्टार खेळाडूला डच्चू?, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCI उचलणार कडक पाऊल
Maharashtra Weather Update: उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC Election 2026: शिवसेना 65, भाजप 57; कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
शिवसेना 65, भाजप 57; कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Ajit Pawar in Baramati: कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
IND Squad vs NZ ODI Series : टी-20 मधून हकालपट्टी, आता वनडे मालिकेतून स्टार खेळाडूला डच्चू?, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCI उचलणार कडक पाऊल
टी-20 मधून हकालपट्टी, आता वनडे मालिकेतून स्टार खेळाडूला डच्चू?, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCI उचलणार कडक पाऊल
Maharashtra Weather Update: उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live: तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
Embed widget