एक्स्प्लोर
First Houseboat in Kokan : आलिशान.. आरामदायी.. कोकणातील पहिलीच 8 खोल्यांची हाऊसबोट! एकदा पाहाच..
First Houseboat in Kokan : दाभोळ खाडीतील ही हाऊसबोट कोकणातील निसर्ग, शांतता आणि कोकणी संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण खास ठरणार आहे.
First Houseboat in Kokan
1/9

कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरचा सुंदर ठिकाण आहे. कोकणातील निसर्ग, स्वादिष्ट अन्न आणि साधी-भोळी लोकं पर्यटकांना आकर्षित करतात.
2/9

दाभोळ खाडीमध्ये पहिली हाऊसबोट कोकणातल्या जलपर्यटनाला एक नवा आयाम देणार आहे.
3/9

या हाऊसबोटमध्ये एकूण आठ खोल्या आहेत. महाराष्ट्रात इतक्या खोल्यांची ही पहिलीच हाऊसबोट आहे.
4/9

दाभोळ खाडीचे शांत आणि सुंदर दृश्य या बोटीवरून पाहता येईल. पर्यटकांना येथे आलिशान आणि आरामदायी अनुभव मिळणार आहे.
5/9

जवळच असलेल्या कांदळवनामुळे या प्रवासात नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून येईल. या हाऊसबोटवर कोकणी पारंपरिक पदार्थांची चवही घेता येईल.
6/9

सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हाऊसबोटमध्ये Deluxe आणि Suite अशा दोन प्रकारच्या रूम्स आहेत.
7/9

Deluxe रूमसाठी दोन व्यक्तींचे एक दिवसाचे दर 6,000 रुपये आहेत. Suite रूमसाठी दोन व्यक्तींचे दर 8,000 रुपये असून स्वतंत्र डेकची सोय आहे.
8/9

दोन्ही रूम्समध्ये तुम्हाला नाश्ता, चहा, दुपारचे व रात्रीचे जेवण मिळेल. ही हाऊसबोट कोकणातील पर्यटन वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
9/9

दाभोळ खाडीतील ही पहिली हाऊसबोट कोकणातील पर्यटनासाठी एक नवी ओळख ठरली आहे. यामुळे पर्यटकांना निसर्ग, शांतता आणि कोकणी संस्कृतीचा एकत्र अनुभव घेता येणार आहे.
Published at : 06 Nov 2025 03:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























