आलिया तिच्या जवळील एका हेल्थ अॅण्ड फिटनेस स्पामध्ये शिकली की, चांगले पचन होण्यासाठी जेवणाच्या थोडा वेळ आधी आणि जेवल्यानंतर थोड्यावेळाने एकाच वेळी भरपूर पाणि पिऊ नये. तहान लागल्यावर तुम्ही या गोष्टीचं सेवन करु शकता जे तुमची तहान शांत करतील. जसं काकडी, दही इत्यादी. तुम्ही खाऊ शकता. आयुर्वेदानुसार त्वेचाला आणि शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात कंदमुळं खायला हवीत. आलियाही खाणं पसंत करते. जसे, काकडी, मुळा, स्वीट पोटॅटो, सलगम, जिमीकंद, अरबी इत्यादी.
2/6
आलिया सूर्यास्तापूर्वी जेवण करणं पसंत करते आणि जेवण कमीत - कमी करण्याचा प्रयत्न करते. आयुर्वेदातही ही गोष्ट सांगितलेली आहे कि, रात्रीचे जेवन सूर्यास्ताआधी व्हायला हवे. कारण चांगल्याप्रकारे जेवनाचे पचन व्हायला हवे आणि शरीराची बायोलॉजिकल घडी विस्कटता कामा नये.
3/6
आलिया ज्युस पिण्यापेक्षा जास्तीत जास्त फळ खाणं पसंत करते. फळ खाल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात फायबर्स मिळतात. या फायबर्सला ज्युस बनवताना गाळून वेगळे केले जाते. यामुळे शरीराला काहीच फायदा होत नाही उलट पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. आयुर्वेदातही ज्युस पिण्याऐवजी फळ खाणे सुचविलेले आहे.
4/6
आलिया म्हणते की, 'मला असं वाटते की आपली त्वचाच सांगत असते आपली तब्येत कशी आहे. यासाठी आलिया दररोज फळांच सेवन करते. तिची ही सवय शरीराला तंदुरुस्त राहण्यासाठीही मदत करते. आयुर्वेद प्रत्येक ऋतूत जास्तीत जास्त फळ खाण्यासाठी सुचवतो.
5/6
उन्हामुळे त्वचेला पोषण, शरीराला व्हिटॅमिन डी आणि हाडांना मजबुती मिळते. आलियाला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा ती उन्हात जाणं पसंत करते. ऊन हे फक्त शारीरिक तंदुरुस्तीसाठी महत्त्वाचे नसून मानसिक स्वास्थ्यासाठीही गरजेचे आहे. आयुर्वेदात ऊन्हाला आणि सूर्यकिरणांना प्राणवायूसमान महत्त्वपूर्ण मानले गेले आहे.
6/6
बॉलीवूडची प्रतिभावंत अभिनेत्री आलिया भट्ट स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काही खास आयुर्वेदिक नियमांच पालन करते. आलिया पुरातन चिकित्सा पद्धतीतील नियमांना फॉलो करते. फक्त फॉलोच नाही तर या नियमांना फॉलो देखील करते. आयुर्वेदिक टिप्स ज्या आलियाला फिट राहण्यामागील कारण ठरतात. याला कोणीही फॉलो करु शकतो.