एक्स्प्लोर
Sheezan Khan : शिझान खानला अखेर दिलासा; एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर जामीन मंजूर
Sheezan Khan : एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
Sheezan Khan
1/10

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खानला अखेर दिलासा मिळाला आहे.
2/10

वसई सत्र न्यायालयातून शिझानला जामिन मिळाला आहे.
3/10

एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
4/10

शिझानच्या वकिलांनी 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.
5/10

सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आर.डी. देशपांडे यांच्या समोर 23 फेब्रुवारी 25 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी आणि 4 मार्चला सुनावणी झाली होती.
6/10

शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे 24 डिसेंबरला तुनिषाने वसईच्या कामण येथील सेटवर आत्महत्या केली होती.
7/10

शिझानने तुनिषाला अत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्याला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
8/10

तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने वालीव पोलीस स्थानकात केली होती.
9/10

'जोधा अकबर' या मालिकेच्या माध्यमातून शिझानने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.
10/10

'अलीबाबा : दास्ताने ए कुबुल' या मालिकेमध्ये शिझान मुख्य भूमिकेत होता.
Published at : 04 Mar 2023 07:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























