एक्स्प्लोर
Happy Birthday Siddharth Jadhav | मराठमोळा सुपरस्टार सिद्धूचा आज वाढदिवस, वाचा त्याच्याविषयी खास गोष्टी!

(Photo:siddharth23oct/IG)
1/9

मराठी रंगभूमी असो, सिनेमा असो किंवा हिंदी कॉमेडी शोज, सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
2/9

गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिम्बा अशा सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये त्याने अभिनय केला आहे पण त्यांचे पहिले प्रेम म्हणजे मराठी चित्रपट, टीव्ही आणि स्टेज असल्याचे तो ठामपणे सांगतो.
3/9

मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत असणार्या अमी सुभाष बोलची नावाच्या बंगाली चित्रपटातही जाधव याने अभिनय केला आहे.
4/9

सिद्धार्थने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात अगदी लहान वयातच केली होती आणि 1996 मध्ये रविकिरण बालनाट्य स्पर्धा येथे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला होता.
5/9

सिद्धू सध्या तरुणांचा स्टाईल आयकॉन बनला असून, अनेक जण त्याच्या स्टाईल स्टेटमेंट फॉलो करत आहेत. या सर्वाचं श्रेय तो त्याची स्टायलिस्ट श्वेता शिंदे आणि पत्नी तृप्ती हिला देतो.
6/9

लोकांसमोर उत्तम प्रकारे स्वत:ला सादर करण्यामध्ये बायको तृप्ती आणि त्याची स्टायलिस्ट श्वेता, मेकअपमन बिपीन आणि त्याचा सहाय्यक राजू यांचा महत्त्वाचा वाटा असतो, असं तो सांगतो.
7/9

रंगभूमीपासूनदेखील सिध्दार्थ मागे राहिलेला नाही. त्याचे 'गेला उडत' हे नाटक माय-बाप रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्या नाटकातील भूमिकेसाठी सिध्दार्थला प्रचंड कसरत करावी लागत होती. त्याच्या त्या उर्जेसाठी प्रेक्षक नेहमीच नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट करत असायचे.
8/9

नेहमीच वेगवेगळ्या भूमिका सिध्दार्थ निवडत असतो. कधी सिनेमा, कधी नाटक तर कधी छोटा पडदा तो गाजवतो. तो करत असलेले निखळ मनोरंजन प्रेक्षकांना कायम भावते.
9/9

आपला सिध्दू हा सिध्दार्थ जाधवच्या हॅशटॅगची चर्चा सिध्दार्थच्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. त्याच्या सोशल मीडियावरील फोटोवर तो टाकत असलेल्या कॅपशनची चर्चा चांगलीच होत असते.
Published at : 23 Oct 2021 01:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion