एक्स्प्लोर
'ही' आहे मराठी सिनेसृष्टीतलं नवी जोडी? जाणून घ्या यांच्या केमिस्ट्रीविषयी
मराठी सिनेसृष्टीत अनेक जोड्या आहेत. बरीच जोड्या या त्यांच्या कामामुळे चर्चेत राहत असतात. पण मराठी सिनेसृष्टीतील एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Lalit Prabhakar and Rinku Rajguru (Source - Instagram)
1/8

सिनेसृष्टीतील कलाकारांच्या बऱ्याच जोड्या या प्रेक्षकांच्या पसंतीस येतातय अशीच एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु.
2/8

छोट्या पडद्यावरु प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. ललितने त्याच्या अभिनयातून कायम प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
3/8

तर सैराट सारख्या चित्रपटांतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. रिंकू देखील तिच्या कामातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
4/8

पण सध्या सोशल मिडियावर या दोघांच्या फोटोमुळे चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
5/8

ललित आणि रिंकूने त्यांच्या सोशल मिडियावरुन त्यांचे फोटो शेअर केले आहेत.
6/8

हे फोटो त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी शेअर केले आहेत.
7/8

मकरंद शशिमधु माने दिग्दर्शित 'खिल्लार' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8/8

या चित्रपटामध्ये रिंकू आणि ललित महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं त्यांनी त्यांच्या सोशल मिडियावरुन सांगितले आहे.
Published at : 07 May 2023 06:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















