एक्स्प्लोर
कलाकारांनी व्यक्त केल्या भाऊबीजेच्या आठवणी !
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेसाठी शूटसाठी घरपासून थोडी लांब रहाते त्यामुळे मला भाऊबीजेची खूप जास्त ओढ आहे.
Zee Marathi Television actress
1/5

'नवरी मिळे हिटलरला' मधली लीला म्हणजेच वल्लरी विराज - "आम्ही इतक्या वर्षापासून भाऊबीज साजरी करत आहोत. पण लहानपणीची भाऊबीज आणि आताच्या भाऊबीज साजरा करण्याच्या पद्धतीत एक मोठा फरक मला जाणवलाय. एक म्हणजे लहानपणी आम्ही एकत्र राहायचो तर मज्जा करायचो पण आता मी 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेसाठी शूटसाठी घरपासून थोडी लांब रहाते त्यामुळे मला भाऊबीजेची खूप जास्त ओढ आहे. पहिले आई-बाबा गिफ्ट आणून द्यायचे तेच मी भावाला द्यायची पण आता मी स्वतः जाऊन त्याच्यासाठी त्याला हवं ते गिफ्ट आणणार आहे."
2/5

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मधली लाडकी नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडे - "मला चुलत भाऊ आहेत. डोंबिवलीत माझे मावस आणि आत्ते भाऊ आहेत, तेव्हा आम्ही भाऊबीज तिकडेच साजरी करणार आहोत. पण अनेक वर्ष शिक्षणासाठी बाहेर राहिल्यामुळे बरेच वेळा भाऊबीज करता आली नाही. जेव्हा आम्ही एका शहरात असतो आणि आम्हाला सुट्टी असते आम्ही न चुकता एक घर ठरवतो आणि सर्व भावंडं एकत्र जमतो, तिथे आम्ही एकत्र भाऊबीज साजरी करतो. आम्ही जवळपास २०-२५ भावंडं आहोत. माझे भाऊ माझ्यापेक्षा लहान आहेत, मी त्यांना सांगते कि तुम्हाला जे हवे त्याची मला लिंक पाठवा आणि मी त्यांच्यासाठी ते ऑर्डर करेन. "
Published at : 01 Nov 2024 02:28 PM (IST)
आणखी पाहा























