एक्स्प्लोर
PHOTO : ‘शेर शिवराज’मध्ये मुकेश ऋषी ‘अफझल खान’, तर वर्षा उसगांवकर साकारणार ‘बडी बेगम’!

Sher Shivraj
1/6

'शेर शिवराज' चित्रपटात अफजलखानाची भूमिका कोण साकारणार? याची उत्सुकता गेले अनेक दिवस साऱ्यांनाच लागली होती. त्या रहस्याभोवतीचा पडदा या ट्रेलर अनावरण सोहळयाच्या निमित्ताने उघडला. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी अफजलखानाची भूमिका साकारणार आहेत.
2/6

या ट्रेलर अनावरणप्रसंगी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील 'शेर शिवराज' हे चौथे पुष्प छत्रपतींच्या चरणी अर्पण करताना आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच चित्रपटाचे निर्माते नितीन केणी, प्रद्योत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे यांचे आभार व्यक्त केले.
3/6

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर उभी राहणारी ही व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मिळाल्याचा आनंद व्यक्त करतानाच ज्याच्या ध्यासात छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशा कल्पक आणि अभ्यासू दिग्दर्शकासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाल्याचं, अभिनेते मुकेश ऋषी यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
4/6

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दराऱ्यामुळेच भारताकडे वाकडया नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत झाली नसल्याचे परखड विधान त्यांनी यावेळी केले. किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडले होते. ‘गनिमीकाव्याने खेळले गेलेले हे युध्द आणि मिळवलेला प्रचंड विजय महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही.
5/6

‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज, तर बलाढ्य अफज़लखानाच्या रुपात मुकेश ऋषी त्यांच्यासोबत, अभिनेत्री वर्षा उसगांवकर या ‘बडी बेगम’ साकारताना दिसणार आहेत.
6/6

शिवचरित्रातील ही यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने 22 एप्रिलला मोठया पडदयावर येणार आहे. ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' या चित्रपटांच्या मोठया यशानंतर लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा 'शेर शिवराज' चित्रपट त्याच यशाची पुनरावृत्ती करेल यात शंका नाही.
Published at : 12 Apr 2022 10:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
