एक्स्प्लोर
sony marathi ganeshotsav ; सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये गणेशोत्सव.
सध्या सर्वत्र गणेशउत्सवाचे वातावरण आहे. गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील सगळ्या मालिकांमध्येही गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.
sony marathi ganeshotsav
1/6

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच विविध गोष्टी करू पाहते. मालिकेचे निराळे विषय आणि रंजक कथानकं प्रेक्षकांची मनं नेहमीच जिंकतात. सध्या सर्वत्र गणेशउत्सवाचे वातावरण आहे. गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील सगळ्या मालिकांमध्येही गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.
2/6

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत यामिनी सराफ आणि राजवीर सराफ यांच्या घरात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्याशिवाय राजवीर आणि मयूरी हे दोघं पालीच्या गणपती दर्शनालाही जाणार आहेत. पालीच्या गणपती मंदिराला भेट देऊन तिथलं दर्शन मालिकेतून प्रेक्षकांना घडवणार आहेत!राजवीर आणि मयूरी यांच्या लग्नानंतर बाप्पांचं आगमन पहिल्यांदाच होणार आहे. मालिका सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोचली आहे, पण सराफांच्या घरी बाप्पांचं आगमन मोठ्या उत्साहात साजरं केलं जाणार आहे.
3/6

'भूमिकन्या' मालिकेत लक्ष्मी आपले वडील बळी यांच्याबरोबर बाप्पांची मूर्ती साकारताना दिसणार आहेत. बळी आणि लक्ष्मी यांनी ती मूर्ती एकत्र सेटवरच साकारली आहे आणि मालिकेतले सगळे कलाकार याच मूर्तीची पूजा करताना दिसणार आहेत. शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावं आणि त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी लक्ष्मी गणपती बाप्पांपुढे प्रार्थना करणार आहे. त्याशिवाय लक्ष्मी टिटवाळ्याच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे.
4/6

सगळ्यांची लाडकी 'तुज माजं सपान' ह्या मालिकेत वीरू आणि प्राजक्ता हे ओझरला गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मालिकेच्या विशेष भागात त्यांनी ओझरला जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. मालिकेचा संपूर्ण चमू तिथं उपस्थित होता आणि तिथे चित्रीकरण करून बाप्पांचे आशीर्वाद घेतले आहेत. बाप्पांच्या विशेष दर्शनाने त्यांच्या नात्यात आलेले दुरावे संपतील का आणि ते पुन्हा एकत्र येऊन त्यांचा संसार सुरळीत चालेल का?
5/6

'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेत बयो आणि इरा चक्क मुंबईतून कोकणात बाप्पांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यामुळे मालिकेत कोकणातल्या गणेशउत्सवाचे दर्शन प्रेक्षकांना घेता येईल. या वर्षी गणपती बाप्पांचे आगमन सर्वत्र जोरदार पद्धतीने करण्यात येते आहे.
6/6

गणेशउत्सवाच्या काळात सर्वत्र गणपतीचा जल्लोश असणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरसुद्धा गणेशउत्सवाचा जल्लोश सगळ्या मालिकांत पाहायला मिळेल. पाहायला विसरू नका, सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमधले 'गणपती विशेष' भाग.
Published at : 06 Sep 2024 03:21 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
























