एक्स्प्लोर

Arun Tupe Death: महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ

त्याच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याच्या शेवटचा रील वर कमेंट करत शोक व्यक्त केला आहे.

Popular Reelstar Death: काही दिवसांपूर्वीच मराठमोळ्या इन्फ्लूएन्सर प्रथमेश कदमचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत अनेकांना धक्का बसला होता. आता आणखी एका लोकप्रिय रीलस्टारच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अरुण तुपे याचं काल (10 मार्च) निधन झालं. राहत्या घरीच मृत अवस्थेत आढळल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तरुण वर्गात अतिशय लोकप्रिय असलेल्या अरुण तुपेने 24 तासांपूर्वीच एक रील शेअर केली होती. पण दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येईल.

रीलस्टार अरुण तुपेच्या निधनाने धक्का

छत्रपती संभाजी नगरच्या बालाजी नगरमध्ये राहणारा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अरुण तुपे याचे मंगळवारी निधन झालं. राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळल्याने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह घाटी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या अहवालातूनच कारण स्पष्ट होऊ शकेल. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याच्या शेवटचा रील वर कमेंट करत शोक व्यक्त केला आहे. त्याचे अनेक जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि चाहत्यांना त्याच्या अचानक निधनाने मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण पिढीमध्ये लोकप्रिय असणारा हा रीलस्टार अरुण तुपे त्याचा instagram वर अनेक रील्स पोस्ट करायचा. कॉमेडी गंभीर कंटेंट तो चाहत्यांसोबत शेअर करायचा. अरुणला अपस्मारचा (फिट) त्रास असल्याचं अनेक जवळचे लोक सांगतायत.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arun Tupe (@kon_aruntupe)

काही दिवसांपूर्वीच मराठमोळ्या प्रथमेश कदम या reel स्टारचा मृत्यू झाला होता. 

प्रथमेश कदम या रिलेस्टरचे महिनाभरापूर्वी निधन 

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला मराठमोळा रिलस्टार  प्रथमेश कदमचे 26 जानेवारीला निधन झाले. गेल्या महिन्याभरापासून प्रथमेश आजारी होता.  त्याच्या अचानक जाण्याने  सोशल मीडिया विश्वासह त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. प्रथमेश आणि त्याचे आई प्रज्ञा कदम दोघा माय -लेकाची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय होती. प्रथमेशच्या मृत्यूनंतर त्याची आई आणि लहान बहिण आहे.  प्रथमेशच्या जाण्याने अनेक कलाकारांना धक्का बसलाय.

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget