एक्स्प्लोर
Rashmika Mandanna: विजय देवरकोंडासोबतच्या अफेअरच्या चर्चेवर रश्मिकानं दिली प्रतिक्रिया; म्हणाली...
रश्मिका (Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा होत असते. या चर्चेवर नुकतीच रश्मिकानं प्रतिक्रिया दिली आहे.
Rashmika Mandanna,vijay deverakonda
1/8

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
2/8

. काही दिवसांपूर्वी रश्मिकाचा वाढदिवस होता. या निमित्तानं तिच्या अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. रश्मिकानं एक व्हिडीओ शेअर करुन सर्व चाहत्यांचे आभार मानले.
3/8

रश्मिकानं व्हिडीओ शेअर केल्यानंतर रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. आता या चर्चेवर नुकतीच रश्मिकानं प्रतिक्रिया दिली आहे.
4/8

रश्मिकानं तिच्या वाढदिवसाला एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओचा स्क्रिनशॉर्ट आणि विजयचा फोटो एका नेटकऱ्यानं ट्विटरवर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं की, 'विजय आणि रश्मिका हे एकमेंकांना डेट करत आहेत.ते दोघे एकाच घरात राहात आहेत.' नेटकऱ्याच्या या पोस्टला रश्मिकानं रिप्लाय दिला आहे.
5/8

रश्मिकानं नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय दिला, 'अय्यो... जास्त विचार नको करु बाबू'. रश्मिकाच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/8

रश्मिका ही तिच्या ग्लॅमरस अदा आणि स्टाईलनं प्रेक्षकांना घायाळ करते.
7/8

पुष्पा या चित्रपटामुळे रश्मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली.
8/8

गुडबाय या चित्रपटामधून रश्मिकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
Published at : 07 Apr 2023 06:19 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
करमणूक


















