एक्स्प्लोर
Karisma Kapoor : हनिमूनलाच पतीने मित्रासोबत बेड शेअर करण्यास सांगितलं, करिश्मा कपूरच्या गौप्यस्फोटाने बॉलिवूड हादरलं
Karisma Kapoor : करिश्मा कपूर ही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे ती जास्त चर्चेत आली आहे.

Karisma Kapoor
1/10

करिश्मा कपूर ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र ती लग्न, संसार या गोष्टींपासून दूर आहे.
2/10

करिश्मा कपूरने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. हिंदी मनोरंजनसृष्टीत तिच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे. पण वैयक्तिक आयुष्यामुळे ती जास्त चर्चेत आली आहे.
3/10

संजय कपूरसोबत लग्न करण्याआधी करिश्माचा अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा झाला होता. पण काही कारणाने करिश्मा आणि अभिषेकचं लग्न झालं नाही. करिश्माने 2003 मध्ये उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केलं. संजय कपूरचंदेखील हे दुसरं लग्न होतं. संजय कपूरसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने मनोरंजनसृष्टीतून ब्रेक घेतला.
4/10

करिश्मा आणि संजय कपूर यांनी संसार थाटला. पण पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत संजय यांचे संबंध होते. त्यामुळे करिश्मा आणि संजय यांचे भांडण होऊ लागले. पुढे घटस्फोटही झाला.
5/10

करिश्माने तिच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की,"सासूबाईंनी मला एक ड्रेस भेट दिला होता. पण मला तो फिट होत नसल्याने मी परिधान केला नाही. त्यावेळी संजय कपूर आईला म्हणाले,"तू तिला मारत का नाही. संजयच्या या बोलण्याने मी खूप हैराण झाले होते".
6/10

करिश्मा पुढे म्हणालेली,"हनीमूनला गेल्यावर संजयने मला त्याच्या मित्रांसोबत झोपायला सांगितलं होतं".
7/10

करिश्मा म्हणते,"संजयसोबत नातं तुटल्यानंतर मी आयुष्यात खूप पुढे गेले आहे. समायरा आणि कियान या माझ्या मुलांसोबत मी आनंदाय आयुष्य घालवत आहे".
8/10

करिश्मा कपूर शेवटची 2006 मध्ये 'मेरे जीवन साथी' या सिनेमात झळकली आहे.
9/10

करिश्माने 'मदरहुड' या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे.
10/10

करिश्माच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
Published at : 09 Dec 2023 11:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
