एक्स्प्लोर
Happy Birthday Thalapathy Vijay : थलापती विजयच्या 'या' गोष्टी आपल्याला माहिती आहेत का?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/56f57e8a7f2031b4383fbe17e0ea1daa_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_1_(9)
1/12
![दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या आज जन्मदिवस आहे. थलापती विजयचे मुळ नाव विजय चंद्रशेखर जोसेफ असं आहे. त्याचा जन्म 22 जून 1974 साली झाला. आतापर्यंत त्याच्या अनेक चित्रपटांतील भूमिका गाजल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/50b9eae6b412273e4fb6145d551d845db72d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या आज जन्मदिवस आहे. थलापती विजयचे मुळ नाव विजय चंद्रशेखर जोसेफ असं आहे. त्याचा जन्म 22 जून 1974 साली झाला. आतापर्यंत त्याच्या अनेक चित्रपटांतील भूमिका गाजल्या आहेत.
2/12
![थलापती विजय हा प्रामुख्याने तामिळ चित्रपटांत काम करतो. त्याचसोबत इतरही दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांत त्यानं काम केलं आहे. विजय थलापती हा तामिळ चित्रपटांतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/0246b792d4947ecbfce7c6db62761ff26d8a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थलापती विजय हा प्रामुख्याने तामिळ चित्रपटांत काम करतो. त्याचसोबत इतरही दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांत त्यानं काम केलं आहे. विजय थलापती हा तामिळ चित्रपटांतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.
3/12
![विजयने वयाच्या दहाव्या वर्षी, 1984 साली 'वेट्री' या नाटकातून अभिनयाची सुरुवात केली. आता त्याचा 'बीस्ट' हा 65 वा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/a89f388e3fb8f001970a4b15c12d51997cc06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजयने वयाच्या दहाव्या वर्षी, 1984 साली 'वेट्री' या नाटकातून अभिनयाची सुरुवात केली. आता त्याचा 'बीस्ट' हा 65 वा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
4/12
![थलापती विजयसोबत आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी काम केलं आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाची सुरुवात थलापती विजयसोबत Thamizhan या चित्रपटाच्या माध्यमातून केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/9e0da5e12f8b155e89734cf70dc0c6a55d196.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थलापती विजयसोबत आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी काम केलं आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाची सुरुवात थलापती विजयसोबत Thamizhan या चित्रपटाच्या माध्यमातून केली होती.
5/12
![पडद्यावर बड्या अभिनेत्रींशी रोमांन्स करणाऱ्या थलापती विजयने लग्न मात्र आपल्या एका संगिता नावाच्या फॅनशी केलं आहे. संगिता युकेमध्ये राहत होती आणि ती विजयची मोठी फॅन होती. आज या जोडप्याला दोन अपत्यं आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/02449d161cd4effe7165ec738a3341f90f734.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पडद्यावर बड्या अभिनेत्रींशी रोमांन्स करणाऱ्या थलापती विजयने लग्न मात्र आपल्या एका संगिता नावाच्या फॅनशी केलं आहे. संगिता युकेमध्ये राहत होती आणि ती विजयची मोठी फॅन होती. आज या जोडप्याला दोन अपत्यं आहेत.
6/12
![वाढदिवसाच्या एक दिवस आधी थलापती विजयच्या नव्या चित्रपटाचा, बीस्टचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सन पिक्चर्सची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/4277e5b03faede3e48a3f11bf20e3c3b93b6c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढदिवसाच्या एक दिवस आधी थलापती विजयच्या नव्या चित्रपटाचा, बीस्टचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सन पिक्चर्सची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
7/12
![या चित्रपटासाठी थलापती विजयने 100 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. हा त्याचा 65 वा चित्रपट आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/5edaaf211c9c33dfed4fe369dcd2a4f23646a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटासाठी थलापती विजयने 100 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. हा त्याचा 65 वा चित्रपट आहे.
8/12
![तामिळनाडू विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थलापती विजय हा थेट सायकलवरून आला होता. विजयच्या सायकलवरून येण्याने सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा चांगलीच रंगली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/af0dba95c697a3a95a7c0d001d5636c2457eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थलापती विजय हा थेट सायकलवरून आला होता. विजयच्या सायकलवरून येण्याने सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा चांगलीच रंगली होती.
9/12
![दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजयचा 'मास्टर' चित्रपट 13 जानेवारी रोजी रिलीज झाला. कोरोनाचे संकट असतानाही विजयच्या 'मास्टर' सिनेमाने 200 कोटी रुपयांचा पल्ला गाठला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/54054085cdacc1b3ffa5b430dc43c9be1bdfc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजयचा 'मास्टर' चित्रपट 13 जानेवारी रोजी रिलीज झाला. कोरोनाचे संकट असतानाही विजयच्या 'मास्टर' सिनेमाने 200 कोटी रुपयांचा पल्ला गाठला होता.
10/12
![विजय थलापती हा गुगल आणि इतर सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केला जाणारा भारतीय आहे. 2012 साली फोर्ब या मॅगझिनने 100 सेलिब्रेटींची यादी तयार केली होती. त्यामध्ये विजय 28 व्या क्रमांकावर होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/4f507d4eb22787d14281c62bde2ce1d5c8231.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजय थलापती हा गुगल आणि इतर सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केला जाणारा भारतीय आहे. 2012 साली फोर्ब या मॅगझिनने 100 सेलिब्रेटींची यादी तयार केली होती. त्यामध्ये विजय 28 व्या क्रमांकावर होता.
11/12
![विजय थलापतींच्या चित्रपटाचे वेड हे केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. जगभरात त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी असून ते विजयच्या चित्रपटांची आतुरतेनं वाट पाहत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/199d402876daab10a4a88c50e11dd6734d728.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजय थलापतींच्या चित्रपटाचे वेड हे केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. जगभरात त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी असून ते विजयच्या चित्रपटांची आतुरतेनं वाट पाहत असतात.
12/12
![थलापती विजय हा अनेक मोठ्या ब्रॅन्ड्सचा ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर आहे. मानवतावादी कार्य आणि मदतीच्या बाबतीतही तो पुढाकार घेतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/22/0246b792d4947ecbfce7c6db62761ff2d1100.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थलापती विजय हा अनेक मोठ्या ब्रॅन्ड्सचा ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर आहे. मानवतावादी कार्य आणि मदतीच्या बाबतीतही तो पुढाकार घेतो.
Published at : 22 Jun 2021 08:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)