एक्स्प्लोर
Kajol: बाजीगर चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण; काजोलनं शेअर केली खास पोस्ट, म्हणाली, "तेव्हा मी 17 वर्षांची होते"
Kajol: बाजीगर या चित्रपटाला रिलीज होऊन 30 वर्ष झाली आहेत. यानिमित्तनं कजोलनं काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Baazigar Completes 30 Years
1/9

बाजीगर हा चित्रपट 1993 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात काजोल, शिल्पा शेट्टी आणि शाहरुख खान यांनी प्रमुख भूमिका साकारली.
2/9

बाजीगर या चित्रपटाला रिलीज होऊन 30 वर्ष झाली आहेत. यानिमित्तनं कजोलनं काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/9

काजोलनं बाजीगर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शाहरुख आणि शिल्पा हे देखील दिसत आहे.
4/9

काजोलनं फोटोला कॅप्शन दिलं, "बाजीगर चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाच्या सेटवर बऱ्याच गोष्टी मी पहिल्यांदा घडत होत्या. मी पहिल्यांदा सरोजजींसोबत काम केले, मी पहिल्यांदाच शाहरुख खानला भेटले. मी पहिल्यांदा अनु मलिकला भेटले.मी जेव्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केला तेव्हा मी 17 वर्षांची होते."
5/9

"अब्बास भाई आणि मस्तान भाई यांनी मला खरोखरच आवडत्या मुलीप्रमाणे वागवले . मी झेवियर थॉमस, जॉनी लीव्हर, शिल्पा शेट्टी यांना कसे विसरू शकते? खूप छान आठवणी आणि कधीही न थांबणारे हसू. दररोज,चित्रपटातील प्रत्येक गाणे आणि संवाद माझ्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य आणतात. कारण बाजीगरला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत." असंही काजोलनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.
6/9

काजोलनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये काजोल आणि शाहरुखचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे.
7/9

ए मेरे हम सफर, बाजीगर ओ बाजीगर आणि ये काली काली आँखे या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
8/9

बाजीगर या चित्रपटामधील शाहरुखच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं.
9/9

काजोल, शाहरुख आणि शिल्पाचा बाजीगर हा चित्रपट आजही लोक आवडीनं बघतात.
Published at : 13 Nov 2023 08:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
पुणे
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
