एक्स्प्लोर
In Pics: शाहरुख खानपासून प्रियांका चोप्रापर्यंत, स्वप्नवत घरात राहतात बी टाऊनचे सेलिब्रिटी
छाया सौजन्य - सोशल मीडिया
1/5

हिंदी कलाविश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांसाठी कोट्यवधींचं मानधन घेतात. या सर्वच सेलिब्रिटींची जीवनशैली आणि त्यांचं राहणीमान हे कायमच कुतूहलाचा विषय ठरतं. यातच आकर्षणाचा विषय म्हणजे, या सेलिब्रिटींचं राहतं घर. शाहरुख खान म्हणू नका किंवा मग अमिताभ बच्चन, ही सर्वच मंडळी आलिशान आणि स्वप्नवत अशा घरात राहतात. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
2/5

अभिनेता शाहरुख खान याचं घर मुंबईतील घर मन्नत हे कायमच सर्वांचं लक्ष वेधतं. ही 6 मजली सी फेसिंग इमारत मुंबईतील सर्वात आकर्षक इमारतींपैकी एक समजली जाते. या घराची किंमत 200 कोटी रुपये आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
3/5

अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेतच स्थायिक झाली. तिचं नावही सर्वात महागड्या घरात राहणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत समाविष्य आहे. लॉस एंजेलिसमध्ये तिचं एक सुरेख असं स्वप्नवत घर आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
4/5

बिग बी अमिताभ बच्चन हे मागील 30 वर्षांपासून त्यांच्या जलसा या घरात राहत आहेत. मुंबईतील जुहू या उच्चभ्रू भागात हा बंगला असून, त्याची किंमत 112 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. 10 हजार 125 चौरस फुटांच्या भूखंडावर हा बंगला उभा आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
5/5

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा बंगला किनारा हा एखाद्या आलिशान महालासारखाच आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या तिच्या या बंगल्याची किंमत 100 कोटी इतकी आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
Published at : 29 May 2021 01:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























