एक्स्प्लोर
Aai Tuljabhavani Marathi Serial: आईच्या आठवणीनं व्याकूळ झालेत बालगणेश, शोध घेण्यासाठी भूतलावर अवतरणार, हाकेला जगदंबा प्रतिसाद देणार?
Aai Tuljabhavani Colours Marathi Serial Track : कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना एक वेगळाच अध्यात्मिक आणि भावनिक अनुभव मिळणार आहे.
Aai Tuljabhavani Colours Marathi Serial Track
1/9

Aai Tuljabhavani Colours Marathi Serial Track : कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना एक वेगळाच अध्यात्मिक आणि भावनिक अनुभव मिळणार आहे.
2/9

मंदिरात जमलेल्या गावकऱ्यांसमोर जनक सांगतात की, "आई तुळजाभवानी म्हणजेच पार्वतीमाता जिने स्वतःच्या अंशापासून विघ्नहर्ता गणपतीची निर्मिती केली. ज्याने तिला आई हाक मार" त्यांच्या या शब्दांवर आपल्याला पार्वतीच्या हृदयातून प्रकटलेला तेजोमय बालगणेश दिसतो.
3/9

याच क्षणी गावकऱ्यांसमोर एक बालक "आई, आई" अशी हाक मारत धावत येताना दिसतो आणि तो दुसरा कोणी नसून स्वतः बालगणेश असतो.
4/9

जनकबाबा त्याची चौकशी करतात "बाळ, कोण आहे तुझी आई?" गणपती थेट गावात उभ्या असलेल्या जगदंबेकडे बोट दाखवत सांगतो, "ही आहे माझी आई...", हे ऐकून सर्वजण स्तब्ध होतात. जगदंबाही चकित होते.
5/9

गणपती मात्र खट्याळपणे हसतो. आता नक्की हे काय रहस्य आहे? असे तो का म्हणतो? हे प्रेक्षकांना मालिकेत कळलेच. आई तुळजाभवानी मालिकेत जगदंबेला साक्षात बालगणेशाकडून मिळणार आईची उपाधी. आता हे कसे उलगघडणार, बाल गणेशाच्या आगमनाने मालिकेत काय नाट्य घडणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
6/9

या कथेमागची पार्श्वभूमी खूपच रंजक आणि नाट्यमय आहे. कैलासावर गणेश आईच्या विरहात हरवलेला आहे. पार्वती माता योगनिद्रेत गेल्यामुळे ती ना कैलासावर आहे ना भूतलावर.
7/9

गणेश महादेवांकडे प्रेमाने विचारतो "आई कुठे आहे? त्या कैलासात येणार आहेत का? नाहीतर मी भूलोकावर जाऊ का? तिथे तुळजा रुपात मला आई भेटेलच, जशी मागच्या वेळी भेटली होती."
8/9

महादेव त्याला सांगतात की, "देवी सध्या योगनिद्रेत आहेत. त्या किती दिवस योगनिद्रेत राहतील हे आम्हालाही ठाऊक नाही." हे ऐकून गणेश हताश होतो.
9/9

त्याला आईच्या हाकांची, तिच्या "गणू" म्हणण्याच्या प्रेमाची प्रचंड आठवण येते. गणेशाच्या मनात आईसोबत घालवलेले क्षण आठवतात. कैलासातल्या क्षणांसोबत भूतलावर तुळजामातेसोबत झालेली भेट ही आठवते. आता बाल गणेश आणि आईची भेट कशी होणार? हे बघणं रंजक असणार आहे.
Published at : 27 Aug 2025 08:52 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























