एक्स्प्लोर
Nandurbar Accident : नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार 15 जण गंभीर, वाहनांचेही मोठे नुकसान
Nandurbar Accident : नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात चार ट्रक आणि एक बसचा भीषण अपघात झाला आहे.

Nandurbar Accident
1/9

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे.
2/9

यात चार ट्रक आणि एक बसचा भीषण अपघात झाला आहे.
3/9

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात एक ठार तर 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
4/9

यात अमळनेर-सुरत बस आणि चार ट्रकांचा अपघात झाला आहे.
5/9

हा अपघात इतका भीषण होता की यात सर्व वाहनांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
6/9

मात्र, हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकलेले नाहीये.
7/9

कोंडाईबारी घाटात वारंवार अपघात होत असतात. मात्र हा अपघात अतिशय भीषण असून वेळीच या अपघातप्रणव क्षेत्रासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
8/9

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
9/9

महामार्ग प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने उपाययोजना होत नसल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.
Published at : 26 Nov 2024 01:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion