मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WaganR) जुलै महिन्यात मारुती सुझुकी वॅगनआर कार भारतात सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. त्याची एकूण विक्री 22,836 युनिट्स होती आणि यामुळे ही कार नंबर वनवर आहे. जून 2021 या महिन्यात WagonR च्या एकूण 19,447 युनिट्स विकल्या गेल्या. तर जुलैमध्ये 3389 युनिट्सची वाढ दिसून आली आहे. (photo courtesy : cardekho)
2/5
मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) मारुती सुझुकीची प्रीमियम स्पोर्टी हॅचबॅक मारुती सुझुकी स्विफ्ट कार विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुलैमध्ये या कारची एकूण 18,434 युनिट्स विकली गेली. गेल्या वर्षी जुलैमध्ये स्विफ्टच्या केवळ 10,173 युनिट्सची विक्री झाली होती. जुलै 2020 च्या तुलनेत यावर्षी त्याची विक्री 81 टक्क्यांनी वाढली आहे.
3/5
मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno) या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही मारुतीचीच आहे. जुलैमध्ये कंपनीची सुझुकी बलेनो ही तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. जुलैमध्ये बलेनोच्या 14,729 युनिट्सची विक्री झाली. जर आपण मागील वर्षाबद्दल बोललो तर जुलै 2020 मध्ये या कारच्या 11,575 युनिट्सची विक्री झाली होती. यंदाच्या वर्षी कारची विक्री 27 टक्क्यांनी वाढली आहे. (photo courtesy : cardekho)
4/5
मारुती सुझुकी अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) मारुती सुझुकी अर्टिगा या यादीत चौथ्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात या कारच्या एकूण 13,434 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने अर्टिगाच्या 8,504 युनिट्सची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या विक्रीत 58 टक्के वाढ झाली आहे. (photo courtesy : cardekho)
5/5
ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) या यादीत पाचव्या क्रमांकावर विक्रीच्या बाबतीत ह्युंदाई क्रेटा ही कार आहे. जुलैमध्ये क्रेटाच्या 13,000 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलै 2020 मध्ये, क्रेटाच्या 11,549 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. (photo courtesy : cardekho)