एक्स्प्लोर
Sovereign Gold Bond Scheme: सरकार विकतंय स्वस्तात सोनं, संधी सोडू नका; पण कसं खरेदी करणार? शेवटची तारीख काय?
Sovereign Gold Bond Scheme: 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान रिझर्व्ह बँक स्वस्तात सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेअंतर्गत स्वस्तात सोनं खरेदी करता येतं.
Sovereign Gold Bond Scheme
1/10

Sovereign Gold Bond Scheme: सोन्यात गुंतवणूक करण्याकडे भारतीयांचा नेहमीच कल असल्याचं पाहायला मिळतो. परंतु, बदलत्या काळासोबतच सोन्यात गुंतवणूक करण्याची पद्धतही बदलल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारकडून वेळोवळी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम जाहीर केली जाते.
2/10

आज सोमवारी म्हणजेच, 11 सप्टेंबर 2023 रोजी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम (Sovereign Gold Bond Scheme) ची दुसरी सीरिज सुरू करण्यात आली आहे.
3/10

या योजनेतंर्गत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला बाजार भावाच्या तुलनेत स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी मिळते.
4/10

या योजनेतंर्गत तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये 11 सप्टेंबर 2023 पासून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करु शकता.
5/10

सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये, गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक करतात म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता येते.
6/10

तुम्ही या SBG योजनेत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे गुंतवणूक करू शकता. ऑनलाईन गुंतवणूक केल्यावर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल.
7/10

तुम्ही ऑफलाईन खरेदी केल्यास तुम्हाला प्रति 10 ग्रॅम 5,923 रुपये मोजावे लागतील. तर ऑफलाईन शॉपिंगसाठी तुम्हाला 5,873 रुपये शुल्क द्यावं लागेल.
8/10

या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक केल्यास, लोकांना सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर 2.50 टक्के व्याज दिलं जाईल.
9/10

सॉवरेन गोल्ड बाँडचा मॅच्युरिटी पीरियड 8 वर्षांचा आहे आणि पाच वर्षांनंतर, ग्राहकांना निवड रद्द करण्याचा पर्याय असेल.
10/10

सार्वजनिक व्यावसायिक बँकांव्यतिरिक्त, तुम्ही काही पोस्ट ऑफिस, NSE, BSE, क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL) इत्यादींद्वारे हे सुवर्ण रोखे खरेदी करू शकता.
Published at : 11 Sep 2023 01:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज






















