एक्स्प्लोर
RBI Meeting: रेपो दराबाबत आरबीआयची बैठक सुरू, कर्ज महागणार?
रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक सोमवारपासून सुरू झाली असून बुधवारी आरबीआय व्याज दराची घोषणा करणार आहे. यावेळीदेखील रेपो दरात व्याज दरवाढ होण्याची शक्यता आहे.
RBI Meeting: रेपो दराबाबत आरबीआयची बैठक सुरू, कर्ज महागणार?
1/11

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक सोमवार, 5 डिसेंबरपासून सुरू झाली आहे.
2/11

एमपीसीच्या मागील तीन बैठकांमध्ये प्रत्येक वेळी व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
3/11

5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या तीन दिवसीय बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते.
4/11

पण यावेळी आरबीआय मागील वेळेपेक्षा कमी रेपो दर वाढवेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
5/11

यावेळी रिझर्व्ह बँक व्याजदरात 0.25 ते 0.35 टक्क्यांनी वाढ करू शकते.
6/11

रेपो दरात वाढ करण्याबाबत मध्यवर्ती बँकेने मवाळ भूमिका स्वीकारण्याची अनेक कारणे आहेत.
7/11

देशात महागाई कमी झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत.
8/11

देशातील महागाईचा दर अजूनही रिझर्व्ह बँकेच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे. याशिवाय अनेक रेटिंग एजन्सींनी भारताच्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज कमी केला आहे.
9/11

व्याजदरात वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत आणखी सुस्ती येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
10/11

या कॅलेंडर वर्षाच्या अखेरीस रेपो दर 6.25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
11/11

कमोडिटीच्या किमतीत झालेली घट आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी पाहता यावेळी रेपो दरात कमी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published at : 06 Dec 2022 09:16 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
महाराष्ट्र


















