Liquor Price Hike: महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
Liquor Price Hike: महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात देशी व विदेशी मद्याच्या दरात केलेल्या वाढीचा परिणाम आता थेट मद्यविक्रीच्या आकडेवारीत दिसून येत आहे.

Liquor Price Hike: महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) जुलै महिन्यात देशी व विदेशी मद्याच्या दरात केलेल्या वाढीचा (Liquor Price Hike) परिणाम आता थेट मद्यविक्रीच्या आकडेवारीत दिसून येत आहे. वाशिम (Washim News) जिल्ह्यात ऑगस्ट 2025 मध्ये देशी व विदेशी दारूच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे, विदेशी दारूच्या विक्रीत तब्बल 16.69 टक्क्यांची घट तर देशी दारूच्या विक्रीत सुमारे 4 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. याउलट बिअरच्या (Beer) विक्रीत मात्र 17 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, ग्राहकांचा कल बदलल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (Liquor Price Hike)
विदेशी मद्याच्या विक्रीत मोठी घसरण
ऑगस्ट 2024 मध्ये वाशिम जिल्ह्यात 1,12,390 लिटर विदेशी दारू विकली गेली होती. मात्र, यावर्षी 2025 च्या ऑगस्टमध्ये ही विक्री घसरून 93,636 लिटर इतकी झाली आहे. त्यामुळे विक्रीत 18,754 लिटरची घट झाली असून, हे प्रमाण 16.69 टक्के इतकं आहे. ही घसरण महत्त्वपूर्ण मानली जात असून दरवाढीचा थेट परिणाम या आकडेवारीतून स्पष्ट दिसतो.
देशी दारू विक्रीतही घसरण, परंतु तुलनेने सौम्य
देशी दारूच्या बाबतीतदेखील घसरण झाली असली, तरी ती तुलनेत थोडी सौम्य आहे. ऑगस्ट 2024 मध्ये देशी दारूची विक्री 3,73,543 लिटर इतकी झाली होती. तर यावर्षी ऑगस्टमध्ये ती विक्री 3,58,833 लिटर इतकी नोंदवली गेली. त्यामुळे 14,710 लिटरची घट झाली असून, विक्री 3.93 टक्क्यांनी घसरली आहे.
बिअरच्या विक्रीत लक्षणीय वाढ
एकीकडे देशी-विदेशी दारूच्या विक्रीत घट होत असताना, बिअरच्या विक्रीत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. 2024 च्या ऑगस्टमध्ये 78,526 लिटर बिअर विकली गेली होती. तर 2025 च्या ऑगस्टमध्ये ही विक्री वाढून 92,053 लिटर इतकी झाली आहे. त्यामुळे 13,528 लिटरची वाढ नोंदवण्यात आली असून, हे प्रमाण 17.23 टक्के इतकं आहे. दरम्यान, मद्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांनी कमी किमतीत मिळणाऱ्या पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. विदेशी दारू महाग झाल्यामुळे अनेक मद्यप्रेमी बिअरकडे वळत असल्याचे दिसून येते. दरवाढीचा हा परिणाम पुढील महिन्यांत कसा राहतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























