एक्स्प्लोर
Health Insurance Claim: 'या' कारणांमुळे रिजेक्ट होऊ शकतो तुमचा हेल्थ इंशोरन्स क्लेम; कसा? ते जाणून घ्या...
Health Insurance Claim: हेल्थ इंशोरन्स क्लेम अनेक वेळा रिजेक्ट केले जातात. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

Health Insurance
1/9

Health Insurance Claim: आज आम्ही तुम्हाला इंश्योरन्स क्लेम रिजेक्ट होण्याची काही कारणं सांगणार आहोत.
2/9

हेल्थ एमरजन्सी उद्भवल्यानंतर हेल्थ इंशोरन्स खूपच फायदेशीर ठरतो. कारण हेल्थ इंशोरन्समुळे उपचारांसाठी लागणारा खर्चाचा बोजा हलका होण्यास मदत होते.
3/9

परंतु, अनेक वेळा हेल्थ इंशोरन्स घेतल्यानंतरही क्लेम रिजेक्ट केला जातो.
4/9

क्लेम रिजेक्ट झाल्यामुळे मोठी पंचायत होते. हेल्थ इंशोरन्सचा क्लेम रिजेक्ट झाल्यानंतर उपचारासाठीची मोठी रक्कम उभी करावी लागते. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पॉलिसी घेताना कोणत्या चुका टाळायला हव्यात....
5/9

अनेक वेळा लोक पॉलिसी खरेदी करताना वय, उत्पन्न किंवा इतर मेडिकल पॉलिसीबाबत चुकीची माहिती देतात. यामुळे कंपन्या हेल्थ इंशोरन्सचा क्लेम रिजेक्ट करतात.
6/9

हेल्थ इंशोरन्स क्लेम रिजेक्ट होण्यमागे मुख्य कारण आहे, आधीपासूनच असलेल्या आजारांबाबत योग्य माहिती न देणं. अनेकजण हेल्थ इंशोरन्स काढताना आधीपासूनच असलेल्या आजारांबाबत माहिती देणं टाळतात. नंतर अनेक कंपन्या इंशोरन्स क्लेम रिजेक्ट करतात.
7/9

प्रत्येक हेल्थ इंशोरन्स पॉलिसीचा एक वेटिंग पीरियड असतो. अशातच या पीरियडमध्ये इंशोरन्स क्लेम केला, तर त्यावेळी तुमचा क्लेम रिजेक्ट केला जातो.
8/9

जर तुम्ही प्रीमियम वेळेत भरला नसेल तर अशा परिस्थितीत हेल्थ इंशोरन्स क्लेम रिजेक्ट केला जातो.
9/9

प्रत्येक हेल्थ इंशोरन्स पॉलिसीचा क्लेम करण्यासाठी एक वेळ ठरलेली असते. या वेळेनंतर क्लेम केल्यानंतर कंपनी क्लेम रिजेक्ट करू शकते.
Published at : 11 Sep 2024 09:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
