एक्स्प्लोर
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana : विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिलांसाठी सरकारची योजना; दरमहा पेन्शन मिळण्याची संधी
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana : राज्य सरकारकडून विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिलांसाठी खास योजना राबवण्यात येते. या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana
1/10

महाराष्ट्र सरकारकडून निराधार महिलांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवण्यात येते. या योजनेद्वारे निराधार महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत केली जाते.
2/10

राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात, ज्याचा लाभ सर्वसामान्यांना घेता येतो. विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिलांसाठी सरकारची खास योजना आहे.
3/10

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana) विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त अशा निराधाप महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 उनदान दिलं जातं.
4/10

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तहसिलदार कार्यलयातील सेतू कार्यालयात संपर्क साधू शकता किंवा घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही नोंदणी करु शकता.
5/10

विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
6/10

त्याशिवाय 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री, इत्यादी दुर्बल निराधार घटक इत्यादी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात.
7/10

या योजनेसाठी वयाचा दाखला - किमान 18 ते 65 वर्ष वय, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
8/10

विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यू दाखला, दिव्यांगांकरता जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला, अनाथ दाखला ही कागदपत्रे या योजनेसाठी गरजेची आहेत.
9/10

यासोबतच दुर्धर आजार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
10/10

यो योजनेअंतर्गत तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा लाभार्थ्याला दरमहा 1500 रुपये लाभ मिळेल.
Published at : 25 Nov 2023 01:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
विश्व
शेत-शिवार
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion