एक्स्प्लोर
Mutual Fund: फक्त 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीनं 9 कोटींच्या फंडाची उभारणी, 'या' SIP नं इतिहास रचला
Mutual Fund: आयसीआयसीआय प्रूडेंशियल म्युच्युअल फंड हा मल्टीकॅप फंड आहे. या फंडाकडून मिड कॅप, लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
10 हजारांच्या एसआयपीनं गुंतवणूकदार मालामाल
1/7

ICICI Prudential Multicap Fund : जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि कोट्यवधी रुपयांच्या फंडाची उभारणी करायचा विचार करत असाल तर आयसीआयसीआय प्रूडेंशियल मल्टीकॅप फंड चांगला पर्याय ठरु शकतो. या फंडची सुरुवात ऑक्टोबर 1994 मध्ये झाली होती.
2/7

आतापर्यंत आयसीआयसीआय प्रूडेंशियल मल्टीकॅप फंडनं गेल्या 30 वर्षात दमदार रिटर्न दिले आहेत. 30 वर्षापूर्वी ज्यानं 10 हजार रुपयांची मासिक एसआयपी सुरु केली असेल त्याच्या फंडची रक्कम 9.8 कोटी रुपये झाली असेल. याशिवाय ज्यानं ऑक्टोबर 1994 मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्याचं मूल्य 79 लाख रुपये झालं असेल.
3/7

मल्टीकॅप फंड म्हणजेच मिड कॅप, लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. यामुळं वेळेनुसार भांडवली वाढ होते.या फंडचा इतिहास पाहिला असता या फंडनं गुंतवणूकदारांना निराश केलेलं नाही.
4/7

या फंडची असेट साइज 15095 कोटी रुपयेअसून एक्सपेंस रेशो 1.74 टक्के आहे. जो कॅटेगरीची सरासरी 1.96 टक्क्यांपेक्षा कमी आहे. हा फंड Nifty 500 Multicap 50:25:25 TRI बेंचमार्कला फॉलो करते.
5/7

ICICI बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक, एक्सिस बँक, सन फार्मा, हिंदुस्तान यूनिलीवर, इन्फोसिस, एल अँड टी, NTPC आणि SBI सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये या फंडकडून गुंतवणूक केली जाते. या फंडकडून या कंपन्यांमध्ये 31.69 टक्के गुंतवणूक केली जाते. या फंडकडून 104 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
6/7

जर तुम्ही पुढील 10 ते 20 वर्षांसाठी एसआयपी किंवा लम्प सम गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आयसीआयसीआय प्रूडेंशियल मल्टीकॅप फंडचा पर्याय निवडू शकता. मात्र, गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
7/7

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 15 Jun 2025 05:56 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















